मुंबई : म्हाडाचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज दाखल करणं आता आणखी सोप्पं होणारंय. म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी एकच कायमस्वरूपी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. त्याचा नोंदणी क्रमांक मिळाल्यानंतर म्हाडाच्या कोणत्याही मंडळासाठी अर्ज दाखल करता येणारंय.
गुरुवारी 5 जानेवारीपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणारंय. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधारकार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला सादर करावा लागणारंय. नोंदणी करणाऱ्या इच्छुकांना पॅनकार्ड, आधार कार्डसह उत्पन्नाचा दाखला आणि निवासी दाखला सादर करावा लागणारंय.
म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढं कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार, 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल करत नवी संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. आता सोडतीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली असून अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रं सादर करावी लागणार आहेत.
या सोडतीआधीच कागदपत्रांची छाननी करून पात्रता निश्चिती करण्यात येणार आहे. पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होऊ शकतील. त्यामुळे सोडतीत विजयी होणाऱ्याला सोडतीनंतर तात्काळ घराचा ताबा देण्यात येणारंय.