Download App

ही तर सावत्रभावाची वागणूक; एमआयडीसीबाबतची बैठक रद्द होताच रोहित पवारांनी डागली तोफ

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On Uday Samant : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची (MIDC) अधिसूचना काढण्यासाठी आमदार रोहित पवार हे आक्रमक झाले होते. त्यांनी विधानभवनाच्या परिसरात आंदोलन केल्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार रोहित पवार, एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. तब्बल साडेचार तास थांबल्यानंतरही उद्योगमंत्री उदय सामंत हे बैठकीला आले नाहीत. त्यामुळे बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यावरून आता रोहित पवार आणखी आक्रमक झाले आहेत. रोहित पवारांनी एक ट्वीट करत सरकारवर तोफ डागली आहे. ( MIDC meeting cancelled, Rohit Pawar fired at the government)

LetsUpp Special : रोहित पवार तब्बल पाच तास थांबले पण उद्योगमंत्र्यांचीच दांडी

कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसीची अधिसूचना काढण्याबाबत मंगळवारी दुपारी अडीच वाजता बैठक घेण्याचे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले होते. त्यामुळे उपोषण मागे घेतले. त्यानुसार मी आणि सर्व अधिकाऱ्यांनी तब्बल साडेचार तास वाट पाहूनही उद्योगमंत्री बैठकीला आले नाहीत, असे पवार यांनी म्हटले आहे.

अजितदादांनी 500 कोटींचा निधी दिला? जयंत पाटील म्हणाले खरं की काय मला माहीतच नाही

यामुळे माझी तर फसवणूक झालीच पण माझ्या मतदारसंघाचीही फसवणूक करून संपूर्ण राज्यातील युवांविषयीचा दृष्टिकोन या सरकारने आपल्या कृतीतून दाखवून दिला असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला आहे. विरोधकांना ‘सावत्रभावाची’ वागणूक देण्याचा हा अत्यंत निंदणीय प्रकार आहे.
तरीही माझी सरकारला पुन्हा एकदा विनंती आहे की एमआयडीची अधिसूचना तातडीने काढून माझ्या मतदारसंघातील युवांना न्याय द्या, अन्यथा माझ्या मतदारसंघातील युवांच्या आणि नागरिकांच्या तीव्र भावना लक्षात घेता याच अधिवेशनात पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशाराही रोहित पवारांनी दिला आहे.

Tags

follow us