LetsUpp Special : रोहित पवार तब्बल पाच तास थांबले पण उद्योगमंत्र्यांचीच दांडी

  • Written By: Published:
LetsUpp Special : रोहित पवार तब्बल पाच तास थांबले पण उद्योगमंत्र्यांचीच दांडी

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : कर्जत-जामखेड मतदारसंघात एमआयडीसी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी लावून धरली आहे. यासाठी ते पाठपुरावा करत आहेत. पण एमआयडीसीला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ती होऊ नये यासाठी राजकीय कोंडी करण्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या मुद्यावरून रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. भर पावसात ते उपोषणाला बसले होते. मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय बनसोडे यांनी हे रोहित पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उपोषणावरून रोहित पवार यांना चांगलेच खडे बोल सुनावले. (letsupp special mla rohit pawar waited for five hours industry ministers absent meeting)

नगरकरांनो अलर्ट! हवामान विभागाने दिला सतर्कतेचा इशारा; येत्या दोन दिवसात जिल्ह्यात…

अखेर या एमआयडीसीबाबत उद्योग विभागाची बैठक बोलवली. या बैठकीत या प्रश्नावर तोडगा काढला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानुसार आज उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीचे अधिकारी यांची विधिमंडळाच्या समिती कक्षात बैठक बोलवण्यात आली होती. दुपारी एक वाजेच्या सुमारास आमदार रोहित पवार आणि अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. उद्योगमंत्री आता येतील, थोड्या वेळात येतील असे बैठकीत सांगण्यात आले. सुमारे पाच तास अधिकारी आणि रोहित पवार हे मंत्र्यांची वाट पहाट होते. पण मंत्री आले नाहीत. शेवटी उद्योगमंत्री यांच्या कडून बैठक रद्द करण्यात आले.

तुम्ही चष्मा बदला, मला सावत्र भाऊ म्हणून बघू नका, अजितदादांचा यशोमतीताईंना टोला…

सुमारे पाच तास रोहित पवार हे मंत्र्यांची वाट बघत ताटकळत बसले होते. ही बैठक राजकीय हेतूने रद्द करण्यात आल्याची एक बाजू पुढे आली. तर परकीय गुंतवुणूकीबाबत एक महत्त्वाचा विषय असल्याने ही बैठक होऊ शकली नाही, अशी माहीती उद्योग विभागाकडून मिळाली. आज बैठक झाली नाही, तर आमरण उपोषण करेल अस इशारा रोहित पवार यांनी दिला होता. आज ही बैठक पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. नक्की ही बैठक कधी होते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आता पवार आता काय भूमिका घेतील हे देखील पाहणे महत्चाचे आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube