तुम्ही चष्मा बदला, मला सावत्र भाऊ म्हणून बघू नका, अजितदादांचा यशोमतीताईंना टोला…

तुम्ही चष्मा बदला, मला सावत्र भाऊ म्हणून बघू नका, अजितदादांचा यशोमतीताईंना टोला…

Assembly Session : निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलचं तापल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांनाच अधिकचा निधी मंजुर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणई मागण्या सादर करताना विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यादरम्यान, त्यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टोलेबाजी केलीयं. (Assembly session : Dcm Ajit Pawar critisize congres mla yashomati thakur)

कुटुंबासह PM मोदींची भेट म्हणजे CM शिंदेंचा सेंडऑफ; 10 ऑगस्टला राजकीय भूकंप निश्चित!

तुम्ही चष्मा बदला, मला सावत्र भाऊ म्हणून बघू नका, असा टोलाच अजित पवार यांनी आमदार यशोमती ठाकूर यांना लगावला आहे. विधानसभेच्या अधिवेशनात अजित पवार पुरवणी मागण्या सादर करीत असतानाच ठाकूर यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यावर अजित पवारांनी यशोमती ठाकूर यांच्यावर टोलेबाजी केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील मतदारसंघाच्या विकासासाठी 1500 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. यामध्ये सर्वच पक्षांच्या आमदारांना निधी देण्यात आला आहे. निधीवाटपाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून आरोप करण्यात आला होता. सत्ताधाऱ्यांनाच अधिक निधी देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला होता. त्यावर अजित पवार विधानसभेत बोलत होते.

Pune Crime Video : पुण्यात अजितदादा समर्थकाकडून रिक्षाचालकास मारहाण

अजित पवार म्हणाले, निधीवाटप करताना आम्ही कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केलेला नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या महाविद्यालयासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून मंजुरी घेत आम्ही निधी मंजूर केला आहे. त्यामुळे आम्ही हे काँग्रेसचे कॉलेज, असा कोणताही भेदभाव केलेला नसल्याचं स्पष्टीकरण अजितदादांनी दिलं आहे.

याचदरम्यान, काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, “यशोमतीताई तुम्ही आमच्या भगिनीसारख्या आहात, तुम्हाला विचारण्याचा अधिकार आहे पण वेळ मिळाल्यानंतर तुम्ही बोला, मी भावाच्या नात्याने ओवाळणी देतो, तुम्ही चष्मा बदला, मला सावत्र भाऊ म्हणून बघू नका, मी सावत्र बहिण म्हणून बघत नाही” असं अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, निधीवाटपावरुन विरोधका आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याने विरोधकांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धऱला जात असल्याचं दिसून येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube