पुणे : जुन्नर (Junnar) तालुक्यातील ज्ञानमंदिर महाविद्यालय आळे येथे अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला (Students) शिक्षकाविषयी शेरो-शायरी केली म्हणून शिक्षक (teacher) आणि शिपायाने बेदम मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणी आळेफाटा पोलीसांत (Police) शिक्षक जयसिंग जाधव व शिपाई सोमनाथ कुऱ्हाडे या दोघांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समूहातील एका विद्यार्थ्याने शेरो-शायरी केली केली म्हणून विक्रम नवले या 17 वर्षीय विद्यार्थ्याचे केस ओढून, लाथा-बुक्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे.
या मारहाणीच्या घटनेचा सर्वच पालकांनी निषेध नोंदवला आहे. त्यामुळे संबंधित पालकांनी शिक्षक, व्यवस्थापन आणि पोलीस प्रशासनची तातडीची बैठक बोलावून सदरच्या गोष्टीबाबत खुलासा मागवला आहे.
बैठकीत अधिकाऱ्यांनी शिक्षकांकडून भविष्यात विद्यार्थ्यांविषयी मारहाणीचे असे प्रसंग घडणार नाही आणि संबंधित शिक्षक आणि शिपायावर आम्ही कारवाई करू अशा पद्धतीचे आश्वासन दिले. सदर घटनेमुळे विद्यार्थी आणि पालक वर्गामध्ये घबराटीचे वातावरण आहे.
याप्रकरणी आळेफाटा पोलीस स्टेशनचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर म्हणाले, पालकांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती परंतु घटनेची गंभीरता लक्षात घेऊन भादवी कलम 323,504,34 सह बाल न्याय अधिनियम काळजी व संरक्षण 2015 चे कलम75, बाल न्याय अधिनियम मुलांची काळजी व संरक्षण 2000 चे कलम 23 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय, असे त्यांनी सांगितले.