ठाकरेंच्या खासदारांनंतर मनसेची सावध भूमिका; ऑपरेशन टायगरदरम्यान शिवतीर्थावर नगसेवकांची बैठक

MNS cautious after UBT MP Splite राज ठाकरेंनी देखील महापालिकेतील नगरसेवक फुटू नये म्हणून शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. 

MNS Cautious After UBT MP Splite

MNS Cautious After UBT MP Splite

MNS cautious stance for BMC corporators after UBT MP Splite meeting at ‘Shivtirth’ amidst ‘Operation Tiger’ : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा आहेत. ते म्हणजे ठाकरेंच्या खासदारांनंतर आता आमदार देखील फुटणार आहे. यातून सावध होत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपले मुंबई महापालिकेतील नगरसेवक फुटू नये म्हणून शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली आहे.

कतारमध्ये ‘रास लाफान इंडस्ट्रियल सिटी’च्या गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट, 12 भारतीयांसह 13 जणांचा मृत्यू

राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीमध्ये स्वत: राज ठाकरे हे नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत. मुंबई महानगरपालिकेतील आगामी राजकीय घडामोडी आणि पक्ष संघटनेच्या बळकटीकरणासंदर्भातील विविध मुद्द्यांवर आजच्या बैठकीत सखोल चर्चा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेतील राजकीय बदलांनंतर मुंबई महापालिकेतील समीकरणांबाबतही विविध तर्क-वितर्क सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना कोणत्या रणनीतीबाबत मार्गदर्शन करतात आणि आगामी निवडणुकांसाठी काय दिशा देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं? मराठी ZEE5 घेऊन येतयं नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटले आहेत. त्यानंतर आता ठाकरेंना पुन्हा मोठा धक्का बसणार असल्याच्या चर्चा आहेत. ते म्हणजे ठाकरेंच्या खासदारांनंतर आता आमदार देखील फुटणार आहे. या अगोदरच शिंदेंच्या आमदारांकडून याचा दावा केला जात होता. मात्र आता ठाकरेंनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला थेट 4 आमदार गैर हजर राहिल्याने ऑपरेशन टायगरमध्ये खासदारांनंतर आमदारही शिंदेंच्या गळाला लागल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तूफान बॅटिंग! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात मान्सूनचं आगमन

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि पक्ष संघटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही आमदारांच्या गैरहजेरीमुळे पक्षांतर्गत अस्वस्थता वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या गैरहजेरीचा संबंध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कथित ‘ऑपरेशन टायगर’शी जोडला जात आहे.

Exit mobile version