राज्यात अनेक ठिकाणी पावसाची तूफान बॅटिंग! पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात मान्सूनचं आगमन
Monsoon arrives सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली.
Monsoon arrives in Western Maharashtra, Vidarbha, and Marathwada Heavy rain in many districts of state : जुनच्या पहिल्याच आठवड्यात (Monsoon) राज्यात मान्सूनचं आगमन झालं होतं. त्यावेळी राज्याच्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाला मोठा ब्रेक लागल्याचं पहायला मिळालं, जुन महिना संपत आला तरी देखील महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडला नव्हता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. सोमवारी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली.
कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकतं? मराठी ZEE5 घेऊन येतयं नवी सीरिज ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’
वैजापूर तालुक्यातील तलवाडा शिवारात दोन तास मुसळधार पाऊस झाला. यामुळे गळमुडी नदीला पूर आला. या पूरामध्ये तात्पुरता पूल वाहून गेल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला. तर दुसरीकडे मराठवाड्यातीलच जालना शहर आणि परिसरामध्ये तसेच हिंगोलीतील वसमत येथेही मुसळधार पाऊस झाला.
लखनौ कोचिंग क्लास आग प्रकरणात तिघांना अटक; इमारत मालक अन् क्लास संचालकाचा समावेश
तसेच विदर्भातील चंद्रपूर, बुलढाण्यातील खामगावमध्ये तासभर पावसाने बॅटींग केली. यामुळे पुण्यानंतर मराठवाड्यातही पावसाने वर्दी दिल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये तूफान पाऊस झाला. तर कुमशेतमध्ये थेट ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे नद्या- नाल्यांना पूर आला होता.
दरम्यान सोमवारीच हवामान विभागाने पुढील 48 तास हे मान्सूनसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, या काळात धाराशिव, पुणे, सोलापूर आणि कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. कोकणात मान्सून अडकला होता, परंतु तो आता पुण्यात दाखल झाला आहे, मराठवाड्यातील दक्षिण भागापर्यंत मान्सून पोहोचला आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे हवामानशास्त्रज्ञ एसडी सानप यांनी दिली होती.