Download App

“मी तेव्हाच राजकारणातून रिव्हर्स गिअर टाकला होता पण..” राज ठाकरेंनी सांगितला जुना किस्सा!

मी 2000 साली एका पक्षात होतो.. ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता.

Raj Thackeray : राज ठाकरे आज राजकारणात (Raj Thackeray) आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्षही आहेत. परंतु, राज ठाकरे यांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती की त्यांनी राजकारण सोडण्याचा विचार केला होता. मी 2000 साली एका पक्षात होतो.. ज्या काही गोष्टी सुरू होत्या त्या पाहून मी रिव्हर्स गिअर टाकला होता. राजकारण नको ठरल्यावर साजिद नाडियादवाला आणि मी प्रोडक्शन हाऊस बनवायचं ठरलं होतं. पण मी पुन्हा राजकारणात येण्यासाठी तोच कारणीभूत आहे असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक नंबर या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंग कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी हा किस्सा सांगितला.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या 13 मागण्या; CM शिंदेंनी वायुवेगाने फिरवली सूत्र

राज ठाकरे पुढे म्हणाले, साजिद नाडियादवालामुळेच मी पुन्हा राजकारणात आलो. मी 2000 साली एका पक्षात होतो. त्यावेळेला त्या पक्षातील राजकारण पाहून मी कंटाळलो आणि एक रिव्हर्सचा गिअर टाकला होता. त्यावेळी मला वाटलं नको ते राजकारण. मला त्या राजकारणात जायचंच नाही. माझी तशी इच्छा नाही. मला कोणतेही धक्के द्यायचे नव्हते असे राज ठाकरे म्हणाले.

मी हळूहळू राजकारण सोडत होतो. त्यावेळी साजीद नाडियादवाला बरोबर प्रोडक्शन हाऊस बनवायचं असा विचार होता. यावर माझं त्याच्याशी बोलणंही व्हायचं. माझी त्याच्याशी भेट व्हायची त्यावेळी त्याने मला एक गोष्ट सांगितली. तो म्हणाला, राज भाई मी एक प्रोड्यूसर आहे. प्रोड्यूसर कशा प्रकारे काम करतात त्यांना काय काय करावं लागतं ते मला माहिती आहे. पण राज ठाकरेंना प्रोड्यूसर बनून ती कामं करताना मी पाहू शकणार नाही. तुम्हा जिथे आहात तिथेच राहा. चित्रपट तयार होतच राहतील, असे साजिदने सांगितले. त्यानंतर मी पुन्हा राजकारणात सक्रिय झालो असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Encounter: असे एन्काऊंटर झाले पाहिजेत; राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंकडून पोलिसांचं अभिनंदन

follow us