Download App

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

BMC Election :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र विधानसभा निवडणुकीत

  • Written By: Last Updated:

BMC Election :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसे (MNS) महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा जोराने सुरु होती मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये (Mahayuti) मनसे सहभागी होऊ शकली नाही. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती मात्र आता पुन्हा एकदा मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि मनसेमध्ये युती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. आज मुंबई  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेत्यांची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीकरता मनसे-भाजप युती चाचपणीच्या चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच महापालिका निवडणुकीत युतीची चर्चा आणि निवडणुकीत जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मनसेकडून एक टीमची नेमणूक करण्यात येणार असल्याची देखील सध्या माहिती समोर येत आहे.

तसेच या बैठकीत विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी होऊ शकली नसल्याचा दावा देखील काही कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे केला. मनसे विधानसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्यास तयार होती मात्र एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली नाही आणि त्याचा फटका भाजपच्या आणि मनसेच्या उमेदवारांना बसला आणि उद्धव ठाकरे यांना फायदा झाला असं मत देखील या बैठकीत काही कार्यकत्यांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडले असल्याचे समजत आहे.

मनोज जरांगेंनी बोलतांना काळजी घ्यावी..मराठा क्रांती मोर्चाकडून सल्ला

त्यामुळे मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये हिंदुत्वाचा मुद्यावर मनसे महायुतीसोबत जाण्यास तयार असल्याचे समजत आहे मात्र त्यापूर्वी मनसेकडून राजकीय स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर युतीबाबत निर्णय होणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

follow us