मुंबई : मध्यंतरी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शीवतीर्थ निवासस्थान जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. एवढेच नव्हे तर, मनसे भाजपमध्ये आगामी निवडणुकांसाठी युती होण्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. मात्र, आता मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शिवतीर्थवर भेटीसाठी येणाऱ्या नेत्यांचे गुपित फोडले आहे. यावेळी त्यांनी विविध घडामोडींवर भाष्य केले. (Bala Nandgaonkar On Politician Meets With Raj Thackeray)
‘गुवाहाटीत टेबलवर नाचायला पैसे पण, औषधांसाठी नाही’; नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरे संतापले
नांदगावकर म्हणाले की, अनेक नेते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी येतात. या भेटीदरम्यान शिरा खातात, पोहे खातात आणि बाहेर ही भेट कौटुंबिक भेट असल्याचे सांगतात मात्र, ही कोणतीही कौटुंबिक भेट वगैरे नसते तर, राज ठाकरे कुणाच्या विरोधात बोलू नये हे सांगायला हे सगळे नेते राज ठाकरे यांच्या घरी येतात असे नांदगावकर म्हणाले.
मराठा आरक्षण द्या
यावेळी नांदगावकर यांनी मराठा आरक्षणाबाबतही भाष्य केले. ते म्हणाले की, कसे ही बसवा पण मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी नांदगावकर यांनी केली. छत्रपती संभाजी नगर लोकसभा निवडणूक जबाबदारी माझ्यावर आणि धोत्रे यांच्यावर असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. निवडणूक पार्श्वभूमीवर शहरात आणि ग्रामीण भागात मेळावे झाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लोकसभा निवडणूक जिंकायची म्हणून निवडणुकीत उतरल्याचे ते म्हणाले.
Reservation : केंद्राचा मोठा निर्णय; आता कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण
राष्ट्रवादीला लगावला जोरदार टोला
आम्हाला उमेदवार आणावे लागत नाहीत. आमच्याकडे शिकलेले मुले असल्याचे सांगत राष्ट्रवादी सारखा आमचा पक्ष जहागीरदार नसल्याचा टोलादेखील त्यांनी लगावला. आम्ही पक्षाच्या विरोधात नाही लढत तर लोकांच्या समस्यांच्या विरोधात लढतो.
राज्यात आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था
नुकत्याच नांदेड, नागपूर आणि छ. संभाजीनगर येथील शासकीय रूग्णांलयामध्ये झालेल्या रूग्णांच्या मृत्युंबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच राज्यात आरोग्य यंत्रणेची दयनीय अवस्था असून, ती सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाने आपले काम करावे. अजित पवार, देवेंद्र फडणवीस ,एकनाथ शिंदे एकत्र आले ही चांगली घटना असल्याचेही यावेळी नांदगावकर म्हणाले.