Download App

Mohit Kamboj यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं; ‘हिंमत असेल तर…’

  • Written By: Last Updated:

मुंबई : हिंमत असेल तर राजीनामा देऊन वरळीतून लढवून दाखवा. तुम्ही निवडून कसे येता हे पाहतो, असे आव्हान आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलं होतं. यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलं आहे.

“आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊन वरळीतून निवडणूक लढवण्याचं आव्हान करत आहेत. पण वरळी का? जर आदित्य ठाकरेंना इतकाच विश्वास असेल तर त्यांनी ठाण्यात जावं आणि एकनाथ शिंदेंविरुद्ध निवडणूक लढवावी. २०१९ मध्ये आदित्य ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर यांच्यामुळे जिंकले होते,” असं मोहित कंबोज म्हणाले.

YouTube video player

दरम्यान, “मी वरळीतून राजीनामा देतो. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देऊन माझ्यासमोर वरळीतून उभे राहावे. निवडून कसे येतात ते मी बघतोच. जी काही यंत्रणा लावायची ती लावा. जी काही ताकद लावायची ती लावा. जेवढे काही खोके वाटायचे ते वाटा पण एक सुद्धा मत विकलं जाणार नाही. एकही शिवसैनिक विकला जाणार नाही. त्यांना पाडणारच” असं खुलं आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

Tags

follow us