Download App

मोहित कंबोज म्हणाले, संजय राऊत ही उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल…

मुंबई : शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये (BJP)फूट पडल्यानंतर एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप आणि शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray Group)गटाच्या नेत्यांकडून एकमेकांना टारगेट केलं जातंय. आज भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्यावर खालच्या पातळीवर ट्वीट करत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल (item girl)संजय राऊत सकाळी सकाळी नशा बंद कर, असं म्हणत आपल्या ट्वीटमधून टीका केली.

भाजप नेते मोहित कंबोज यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल संजय राऊत सकाळी सकाळी नशा करणं बंद कर, नवाब मलिक तर गर्दुल्ला होता, तू देखील सकाळी सकाळी नशा करायला सुरुवात केली आहे असं वाटतंय. जरा तोंड बंद करण्याची गरज आहे, असंही आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

‘माझ्यावर टीका करणाऱ्यांनी बांधावर जावे’; ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

राज्यातील राजकारणात काही दिवसांपासून कुत्रे, गद्दार अशा शब्दांचा वापर केला जातोय, त्यातच आता आयटम गर्ल या शब्दाचीही भर पडल्याचं पाहायला मिळतंय. संजय राऊत ही उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल असल्याचं ट्वीटमध्ये म्हटल्यानंतर नेटकऱ्यांनीही त्यावर संमिश्र प्रतिक्रीया दिल्याचं पाहायला मिळतंय. या शब्दा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे दररोज सकाळी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधतात. सत्ताधाऱ्यांवर टीका करतात. त्यावरुन भाजप नेते मोहित कंबोज यांनी निशाणा साधलाय, यापूर्वी पत्राचाळ घोटाळाप्रकरणी संजय राऊत 100 हून अधिक दिवसांनी तुरुंगाबाहेर आले होते, त्यानंतरही कंबोज यांनी ट्वीट करत संजय राऊतांवर निशाणा साधला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं की, लगता हैं कल से फिर मैदान में उतरना पड़ेगा …, त्यानंतर आता त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जावून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केलीय.

Tags

follow us