अचानक बैठकीला आलेल्या कपिल सिब्बलांवर काँग्रेसचा राग का ?

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक दोन दिवस मुंबईत पार पडली. या आघाडीचे सर्वच घटक पक्षांना बैठकीला बोलविण्यात आले होते. सर्व पक्षांचे प्रमुख नेते हजर होते. परंतु या बैठकीला एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कपिल सिब्बलही उपस्थित राहिले. कपिल सिब्बलांना (MP Kapil Sibal) निमंत्रण नसतानाही ते बैठकीला आले. त्यावरून काँग्रेसचे नेते चिडले. त्यात सर्वाधिक […]

Letsupp Image   2023 09 01T135136.006

Letsupp Image 2023 09 01T135136.006

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी इंडिया (INDIA) आघाडीची बैठक दोन दिवस मुंबईत पार पडली. या आघाडीचे सर्वच घटक पक्षांना बैठकीला बोलविण्यात आले होते. सर्व पक्षांचे प्रमुख नेते हजर होते. परंतु या बैठकीला एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेले कपिल सिब्बलही उपस्थित राहिले. कपिल सिब्बलांना (MP Kapil Sibal) निमंत्रण नसतानाही ते बैठकीला आले. त्यावरून काँग्रेसचे नेते चिडले. त्यात सर्वाधिक चिडले ते काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल. काँग्रेससाठी एकेकाळी मोठे नेते राहिलेले व सर्वोच्च न्यायालयातील प्रसिध्द कायदेतज्ज्ञ कपिल सिब्बलांवर काँग्रेसचा राग का असा प्रश्न येतो.

‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!

गेल्या वर्षी मे महिन्यात कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते तब्बल तीन दशके काँग्रेसमध्ये होते. तर सिब्बल हे यूपीए सरकारमध्ये कायदेमंत्री, मानव संसाधन खात्याचे मंत्री राहिले आहेत. दिल्लीतील ते मोठे नेते आहेत. काँग्रेसच्या जी-23 नेत्यांचा गटात त्यांचा समावेश होता. गेल्या वर्षी समाजवादी पक्षात दाखल झाले.


‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाचे ठराव, ‘लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार’

काँग्रेस सोडताना कपिल सिब्बल यांनी काँग्रेस व गांधी घराण्यावर जोरदार टीका केली होती. गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडून दिले पाहिजे, असे सिब्बल म्हणाले होते. सिब्बल यांच्या या भूमिकेवरून काँग्रेसचे नेत्यांना त्यांना जोरदार सुनावले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून कपिल सिब्बल राज्यसभेवर गेले.

कपिल सिब्बल हे काँग्रेसमध्ये असताना ते पक्षासाठी मोठा निधी ही जमा करत होते. कपिल सिब्बल यांना पक्षाने महत्त्वाचे पदे दिल्यानंतर ते नाराज झाले हे काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना रुचले नाही. पक्षाच्या वाईट काळात ते पक्षा सोडून गेले ही सल काँग्रेसच्या नेत्यांच्या मनात आहे हे कारण वाद होण्यामागे आहे.

राहुल गांधींनी दाखविला मोठेपणा
काँग्रेस नेते चिडले असले तरी राहुल गांधी यांनी मात्र मनाचा मोठेपणा दाखवला. सिब्बल बैठकीला आल्यामुळे मला काही अडचण नाही, अशी भूमिका राहिल गांधींची होती. फारुक अब्दुल्ला आणि अखिलेश यादव यांनी वेणुगोपाल यांचीही नाराजी दूर केली. त्यानंतर कपिल सिब्बल यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांबरोबर फोटो काढला. त्यानंतर बैठकीत ते सहभागी झाले आहेत.

Exit mobile version