‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi : भाजपवाले म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही तर मग कर्नाटकातून भाजपला (BJP) कुणी साफ केलं. महाराष्ट्रात आता कोणती पार्टी उभी आहे. काँग्रेसची मोदी, आरएसएसला भीती वाटत आहे. आता चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत तिथे जे कर्नाटकात झालं तेच होणार. त्यानंतर राष्ट्रीय निवडणुकीतही काँग्रेसच (Congress) जिंकणार असा निर्धार व्यक्त करत इंग्रज काँग्रेसमुक्त भारत करू शकले नाहीत तिथे मोदी काय करणार?, असे आव्हान देणारा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर (INDIA Meeting) मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली.
‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाचे ठराव, ‘लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार’
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, आम्ही हिंसा, द्वेषाने काम करत नाही तर आम्ही शत्रुच्या प्रदेशात जाऊन तेथे प्रेमाचं दुकान उघडतो. आता त्यांच्या घरात जाऊन प्रेमाचे दुकान सुरू करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी तयार राहा. मुंबई आणि महाराष्ट्र माझ्या आवडीची ठिकाणं आहेत. प्रत्येक संघटनेत काही नाराजी असते. उणीदुणीही असतात पण, मुंबई हे काँग्रेसचे महत्वाचे केंद्र राहिले आहे. आताही महाराष्ट्रात कोणती पार्टी उभी आहे असे स्पष्ट करत कार्यकर्ते हीच काँग्रेसची ताकद आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
आपल्या शरीरातील रक्त काढले तरी डीएनए एकच असेल. तो कुणाला भीत नाही. हा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. काँग्रेसमध्ये सिंह आहेत आणि हा बब्बर सिंहांचा पक्ष आहे. या पक्षात सिंहीणी सुद्धा आहेत. भाजप, मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला काँग्रेसची भीती वाटते. महाराष्ट्रात यांचा सफाया होणार आहे. इंडिया आघाडीच भाजपाचा पराभव करणार आहे. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. मोदी सत्तेत आले तेव्हा काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती. मात्र जे ब्रिटिशांना जमलं नाही ते यांना कसं जमेल. अदानी आमचं काहीच करू शकत नाही. अदानीचा पैसा काँग्रेसला संपवू शकणार नाही, असे आव्हान गांधी (Rahul Gandhi) यांनी दिले.
INDIA Alliance : आमची एकजूट पाहून विरोधकांमध्ये घबराट वाढलीय; ठाकरेंचा भाजपवर निशाणा
इंडियाची एकजुटीमुळे विरोधकांना धडकी – ठाकरे
इंडिया आघाडी (INDIA Alliance) जसं जसं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. तसं तसं आमच्या विरोधकांमध्ये घबराट होत आहे. अनेक ठिकाणी विविध घटना घडत आहेत. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई वाढली आहे. गॅस स्वस्त केला हे म्हणजे 5 वर्ष लूट आणि निवडणुकीच्यावेळी सूट असा प्रकार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.