INDIA Alliance : आमची एकजूट पाहून विरोधकांमध्ये घबराट वाढलीय; ठाकरेंचा भाजपवर निशाणा
INDIA Alliance : इंडिया आघाडी (INDIA Alliance) जसं जसं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. तसं तसं आमच्या विरोधकांमध्ये घबराट होत आहे. अनेक ठिकाणी विविध घटना घडत आहेत. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई वाढली आहे. गॅस स्वस्त केला हे म्हणजे 5 वर्ष लूट आणि निवडणुकीच्यावेळी सूट असा प्रकार आहे. अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
Shah Rukh Khan: किंग खानचं ‘जवान’ सिनेमाबद्दल मोठं गौप्यस्फोट; म्हणाला, ‘यापुढे कधीच करणार…’
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
इंडिया आघाडीची (INDIA Alliance) तिसरी बैठक संपन्न झाली आणि आमची आघाडी दिवसेंदिवस जास्त मजबूत होत आहे. हे देखील खरं आहे की, जसं जसं आम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहोत. तसं तसं आमच्या विरोधकांमध्ये घबराट होत आहे. तसेच ही आमची विरोधी पक्षाची एकजुट नाही तर आम्ही सर्व देशप्रमी आहोत. आमची एकी ही देशप्रमींची एकता आहे.
‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाचे ठराव, ‘लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार’
त्यामुळेच आम्ही आमच्या एकीला इंडिया (INDIA Alliance) हे नावं दिलं आहे. आमचे विरोधक कोण आहेत हे तुम्हाला माहित आहेच. आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. काही समित्या स्थापन केल्या आणि आम्ही सर्वांनी ठरवलं आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही हुकुमशाही विरोधात लढणार आहोत. जुमलेबाजांच्या विरोधात लढणार आहोत. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार आहोत.
एक गोष्ट मी नक्की सांगेल की, आम्ही मित्र परिवार वादाच्या विरोधात लढणार आहोत. कारण मी बंगालमध्ये म्हटलं होत की, सगळा भारत माझा परिवार आहे. मात्र काही लोकांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला पण निवडणुका झाल्यानंतर सबको लाथ आणि मित्रांचा विकास केला जात आहे. हा मित्रपरिवार वाद आता आम्ही चालू देणार नाही.
आमची ही लढाई दिवसेंदिवस जास्त मजबूत होत जाईल. गरिब लोक आणि जनतेत भीतीचं वातावरण आहे. मात्र आता या बैठकीनंतर विरोधक घाबरले आहेत. त्यांनी रात्री तून विशेष सत्र बोलावलं आहे. मात्र आम्ही लोकांना विश्वास देत आहोत. भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. अनेक ठिकाणी विविध घटना घडत आहेत. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महागाई वाढली आहे. गॅस स्वस्त केला हे म्हणजे 5 वर्ष लूट आणि निवडणुकीच्यावेळी सूट असा प्रकार आहे. अशी टीका यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.