MSRDC : ठाण्यामध्ये एक गंभीर घटना घडली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा मुलगा अश्वजीत याने त्याच्या प्रेयसीच्या हत्येचा प्रयत्न केला आहे. अश्वजीत याने आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने तरुणीच्या अंगावर कार घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात तरुणीही गंभीर जखमी झाली आहे.अश्वजीत गायकवाड हा पालघर भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे.
ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला दीड लाख रुपये पगार
अश्वजीत आणि जखमी तरुणीचे चार वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. अश्वजीत हा विवाहित आहे. त्याने ही बाब तरुणीपासून लपवून ठेवले होते. तरुणीला हे कळल्यावर तिने त्याला जाब विचारला होता. त्यामुळे अश्वजीत याने तरुणीचा फोन घेणेही बंद केले होते. एक फोन झाल्यानंतर अश्वजीतने तिला घोडबंदर भागातील कोर्टयार्ड हॉटेलजवळ भेटण्यासाठी बोलविले होते. दोघे भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये जोरदार भांडणे झाले. त्यातून चिडलेल्या अश्वजीतने आपल्या चालकाला तरुणीच्या अंगावर रेंज रोव्हर गाडी घालण्यास सांगितले. त्यात तरुणी गंभीर जखमी झाली होती.’
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार? दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका
जखमी तरुणीला नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात जाऊन पोलिसांनी जखमी तरुणीकडे चौकशी केली आहे. दरम्यान अश्वजीतचे काही मित्र हे रुग्णालयात येऊन धमकी देत असल्याचे आरोपही जखमी तरुणीकडून केले जात आहे. या तरुणीने सोशल मीडियावरूनही काही आरोप केले आहेत.
ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त…
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) December 15, 2023
महिला आयोगाने अहवाल मागितला
ठाणे जिल्ह्यात तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना प्रसार माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून, मानसिक तणावाखाली आहे. या वृत्ताची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. ठाण्याचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे, असे ट्वीट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.