मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळणार? दिलीप वळसे पाटलांनी मांडली भूमिका
Dilip Walse Patil On Maratha Reservation ; राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन चांगलच वादंग सुरु आहे. एकीकडे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली तर दुसरीकडे हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणावर जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच आता सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटलांनी (Dilip Walse Patil) मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मोठं विधान केलं आहे. मराठा समाजाला टिकणारंच आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत.
कर्जवसुलीसाठी बॅंकेने छळलं, ‘त्याने’ आयुष्यच संपवलं; वसंत मोरेंच्या नावे लिहिली चिठ्ठी
पुढे बोलताना दिलीप वळसे-पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकार अतिशय गंभीर आहे. सरकारच्या परिने सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून आरक्षण देताना टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे असा प्रयत्न सरकार करतं असून त्यातून नक्की मार्ग निघेल, असंही दिलीप वळसे-पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे आता मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्तापर्यंत अनेक आंदोलने मोर्चे उपोषणे करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं. पहिल्यांदा मनोज जरांगे यांनी जवळपास 17 दिवस उपोषण केल्याचं पाहायला मिळालं. अखेर सरकारच्या ठोस आश्वासनानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं होतं. त्यानंतर सरकारकडून कोणतीही ठोस पाऊल उचलली जात नसल्यानेच मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं होतं.
फडणवीस हे खोटं बोलताहेत, त्यांच्याकडून दिशाभूल केली जातेय; सुषमा अंधारेंचा आरोप
दुसऱ्यांदा मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तेव्हा मनोज जरांगे यांना समर्थन देण्यासाठी राज्यभरात मराठा समाजबांधवांकडून मोर्चे काढण्यात आली होती. तर बीडमध्ये या आंदोलनाला हिसंक वळण लागल्याचं पाहयला मिळालं होतं. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह संदीप क्षीरसागर यांचं घर पेटवून दिल्याचं पाहायला मिळालं होंतं. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याकडून 24 डिसेंबरपर्यंतची मुदत वाढवून घेतली .
अखेर 24 डिसेंबर ही तारीख जवळ येत असून हिवाळी अधिवेशनातही मराठा आरक्षणाचा मुद्दा विरोधक आमदारांकडून उचलून धरण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मनोज जरांगे यांचा राज्यभर दौरा सुरु असून या जाहीर सभांमधून मनोज जरांगे पाटील राज्य सरकारसह मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या नेत्यांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, एकूण या संपूर्ण घडामोडीनंतर आता राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे आता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण मिळेल की नाही? हे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.