Bandra–Worli Sea Link: मुंबई शहरामधील महत्त्वाचा रस्ता वांद्रे-वरळी सागरी मार्गावरुन (Bandra–Worli Sea Link) 1 एप्रिल पासून टोल वाढ करण्यात येणार आहे. अरबी समुद्रावर बांधण्यात आलेल्या या पुलामुळे मुंबईच्या वांद्रे उपनगराला दक्षिण मुंबईच्या वरळीसोबत जोडले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने विकसित केलेला हा पूल हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने बांधला आहे.
आता वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी मार्गावरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशाला 1 एप्रिलपासून कात्री बसणार आहे. या ठिकाणी टोलमध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) घेतला आहे. पुलावरील पथकरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पथकरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सागरी सेतूवरुन जाणाऱ्या कारचालकांना 100 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून प्रवास करणाऱ्या मिनी बस किंवा तत्सम वाहनांना आता 160 रुपये पथकर भरावा लागणार आहे. तसेच ट्रक आणि बसला 210 रुपयांचा फटका बसणार आहे.
या अगोदरचे दर
वांद्रे-वरळी राजीव गांधी सागरी मार्गावरुन या अगोदर कार आणि जीपकडून 85 रुपये वसूल केले जात होते. ते आता शंभर रुपये झाले आहे. मिनी बसकडून 130 रुपये घेतले जात होते. त्यात 30 रुपयांची वाढ करुन 160 रुपये करण्यात आला. तसेच ट्रक किंवा बसकडून पूर्वी 175 रुपये पथकर घेतला जात होता. तो आता 35 रुपयांनी वाढवून 210 करण्यात आला.
शहा, फडणवीस यांनी परीक्षा घेतली.. एकनाथ शिंदेंना ६० टक्के गुण पडले!
दर तीन वर्षांना फटका
एमएसआरडीसी’कडून दर 3 वर्षांनी या रस्त्यावरील पथकरात वाढ करण्यात येत आहे. याअगोदर एप्रिल 2021 मध्ये पथकरात वाढ करण्यात आली. आता पुढील 3 वर्षांसाठी म्हणजेच 31 मार्च 2027 पर्यंत नवे दर लागू होणार आहे. या सागरी सेतूमुळे मुंबईतील दक्षिणी आणि पश्चिमी भाग जोडला गेला आहे. रास्ते मार्गाने या ठिकाणी जाण्यासाठी 60-90 मिनिटे लागत होते. आता केवळ 6-8 मिनिटे लागत आहे. 4.8 किलोमीटर लांबीचा हा सागरी मार्ग आहे.