Download App

मुंबई ठरले देशातील सर्वाधिक ‘हॉटेस्ट’ शहर

मुंबई : मार्च महिना अर्धा संपत आला आहे आणि दुसरीकडे सूर्याने देखील आग ओकायला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस आता उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. यातच महाराष्ट्राची राजधानी असलेली मुंबई शहरात सध्या स्थितीला सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई हे देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. मुंबईचा पारा 39.04 अंशावर होता. हवामानाची नोंद करणाऱ्या सांताक्रुझ केंद्रामध्ये ही नोंद करण्यात आली आहे. पुढील दोन दिवस वातावरण कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

थंडीची लाट कमी झाली असून गेल्या काही दिवसांपूर्वी ढगाळ वातावरण देखील निर्माण झाले होते. यातच अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हे एकीकडे सुरु असताना आता मात्र उष्णतेने कहर करण्यास सुरुवात केली आहे.

दिवसेंदिवस देशातील उष्णतेचा पारा वाढू लागला आहे. देशातील अनेक ठिकाणी मोठ्या तापमानाची नोंद देखील झाल्या आहेत. यातच मुंबईमध्ये पारा 39 अंश सेल्सियस पार गेला आहे. यामुळे मुंबईकरांना उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या दोन दिवसापासून कमाल तापमान वाढतं आहे. शनिवारी 38.5 अंश सेल्सिअस तापमान होते ते रविवारी 39.4 अंशावर गेले आहे. पुढे या तापमानात अजुन दोन दिवस वाढीचा अथवा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?

मार्च महिन्यात एप्रिल मे महिन्याची धग जाणवू लागल्याने मुंबईकर हैराण झाले आहेत. त्यात वाताचरणात झालेल्या बदलामूमुळे खोकला, सर्दी तापाचे रुग्ण संखेत मोठी वाढ झाली आहे. यंदा उन्हाचा तडाखा हा मोठ्या प्रमाणावर असू शकतो अशी शक्यता यापूर्वीच तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र सध्याची परिस्थिती पाहता तज्ज्ञांचा हा अंदाज खरा ठरतो की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.

Oscar Awards 2023 : भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ची ऑस्करवर मोहोर!

वाढत्या उन्हाळ्यात स्वतःची घ्या काळजी
जर अति महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर जाणे टाळा
शक्यतो उन्हाच्या वेळेत बाहेर फिरणे टाळावे
दिवसभरात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या
हलके, पातळ व सच्छिद्र कपडे वापरावेत.
जर तुम्ही उन्हात काम करत असाल तर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा
उन्हाळ्याच्या दिवसात शरीरामधील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदी थंड पेयांचे सेवन करावे

Tags

follow us