‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?

‘नॉट रिचेबल’ हसन मुश्रीफ आज ईडी कार्यालयात हजर राहणार का?

मुंबई : सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांच्यामागे ईडीचे सत्र सुरु आहे. यातच सध्या ईडीच्या रडारवर माजी मंत्री तसेच विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हे आहे. नुकतीच ईडीकडून त्यांची नऊ तास कसून चौकशी देखील झाली आहे. दरम्यान आज मुश्रीफ यांना ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ईडीकडून सुरु असलेल्या कारवाईवर सध्या मुश्रीफांनी कोणतेही भाष्य केले नाही आहे. तसेच मुश्रीफ सध्या नॉट रिचेबल आहेत, त्यामुळे आज ते ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरी सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) तब्बल नऊ तास छापेमारी सुरु होती. या दरम्यान त्यांनी कसून चौकशी केली त्यानंतर त्यांनी मुश्रीफ यांना आज सोमवार (13 मार्च) रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना समन्सच्या माध्यमातून दिल्या आहे. विशेष म्हणजे मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी तिसऱ्यांदा छापेमारी करण्यात आली असल्याने मुश्रीफ अडचणीत आले आहेत का? अशी चर्चा आहे.

मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत, शेतकऱ्यांबद्दल केलं ‘हे’ विधान

ही आहेत मुश्रीफांच्या अडचणीचे कारणं…
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात अनेक फसवणुकीचे तसेच घोटाळ्याचे आरोप केलेले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, अप्पासाहेब नलवडे साखर कारखाना कर्ज प्रकरणात ईडी सध्या मुश्रीफ व त्यांच्या कुटुबीयांची चौकशी करत आहे. अनेकदा ईडीकडून त्यांच्या निवास्थानी छापेमारी झाली आहे. मुश्रीफांविरोधात ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

निलेश राणेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणं तरुणाला पडलं महागात!

ईडीच्या कारवायांविरोधात मुश्रिफांची पत्नी आक्रमक…
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सध्या हसन मुश्रीफ हे ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान ईडीचे अधिकारी यांनी मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी धाड टाकली. दरम्यान मुश्रीफ हे त्यावेळी घरी नव्हते. अधिवेशनासाठी ते मुंबईत असताना ही कारवाई झाल्याने मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून याचा निषेध करण्यात आला. यावेळी मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी संतप्त होत आपल्याला गोळ्या घाला अशा शब्दात या कारवाईचा निषेध केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube