मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत, शेतकऱ्यांबद्दल केलं ‘हे’ विधान

मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा चर्चेत, शेतकऱ्यांबद्दल केलं ‘हे’ विधान

छत्रपती संभाजीनगर : शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नसून अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत, असल्याचं विधान शिंदे-फडणवीस सरकारचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. मंत्री सत्तार याआधीही वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या या विधानामुळे सत्तार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

गुलाबराव पाटलांनी सांगितलं उद्धव ठाकरेंना सोडण्याचं कारण…

मंत्री सत्ता म्हणाले, मी माझ्या मतदारसंघात फिरलो आहे, शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं आहे.

तसेच पहिल्या माहितीनुसार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं काही नुकसान नव्हतं. मात्र, वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान नाही परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

बांग्लादेशी घुसखोर, रोहिंग्यांवरील कारवाईसाठी पुण्यात ‘पतित पावन’ आक्रमक

काही दिवसांपूर्वीच राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस झाल्याने शेतकरी मोठ्या अर्थिक संकटात सापडला आहे. आधीच कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना आणखीनच हवालदिल केलं आहे.

अधिवेशानाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांना ठोस मदत मिळाली नसल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवरच आंदोलनही करण्यात आलं.

विरोधकांच्या मागणीनंतर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आम्ही शेतकऱ्यासोबत असल्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. अखेर फडणवीस यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या या विधानानंतर शेतकऱ्यांमधून पुन्हा संतापाची लाट उसळत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube