R. Tamil Selvan : मुंबई महापालिका (BMC)अधिकाऱ्यांना मारहाण करणं भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन (R. Tamil Selvan)यांना चांगलंच महागात पडलं आहे. भाजपचे (BJP)आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष सत्र न्यायालयाने (Court of Special Sessions, Bombay)हा निर्णय दिला आहे. शिक्षेत सवलत दिल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाईल, असे न्यायालयाने यावेळी म्हटले.
Manipur : मणिपुरात आणखी काही दिवस इंटरनेट बंदच; ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
बेकायदा वीज आणि पाणीपुरवठा खंडीत करण्यासाठी गेलेल्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना भाजप आमदार कॅप्टन आर. तामिळ सेल्वन यांनी मारहाण केली होती. त्या पार्श्वभूमीवर तामिळ सेल्वन यांच्यासह पाच जणांना सहा महिन्याच्या कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
मुख्यमंत्री संकुचीत मनोवृत्तीचे, सर्वपक्षीय बैठकीवरुन संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांच्यावर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप आहे. कॅप्टन सेल्व्हन हे भाजपचे सायन कोळीवाडा मतदारसंघातील आमदार आहेत. कॅप्टन तामिळ सेल्वन यांना सोमवारी विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने सेल्वन यांच्यासह सर्वांना प्रत्येकी 13 हजार 500 रुपयांचा दंड भरण्याची शिक्षा सुनावली आहे.
आरोपींना शिक्षेत दया दाखवल्यास चुकीचा संदेश जाईल, असेही यावेळी न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली. आरोपींमध्ये कॅप्टन सेल्वन यांच्यासह माजी नगरसेवक जसबिरसिंग बिरा, इंद्रपालसिंग मारवा, दर्शनबीर सिंग कोच्छर, गजानन पाटील यांचाही समावेश आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणुकीपूर्वी सायन कोळीवाडा भागातील पंजाबी कॉलनीची तपासणी केली. त्यानंतर बेकायदा वीज आणि पाणीपुरवठा कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय झाला. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली होती.
पालिका कर्मचारी व पोलिसांची टीम पंजाबी कॉलनीत पोहोचल्यानंतर त्यांना काम करण्यापासून रोखण्यात आले. त्यांना मारहाणही करण्यात आली. मुंबई महापालिकेच्या कारवाईविरोधात आरोपी सेल्वनने एक हजार लोकांच्या जमावाचं नेतृत्व केलं. पोलिसांनी अतिरिक्त फौजफाटा मागवल्यांतर ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं.