BMC मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 226 जागांची भरती, पगार 81 हजार रुपये

BMC मध्ये कनिष्ठ लघुलेखक पदांच्या 226 जागांची भरती, पगार 81 हजार रुपये

Mumbai Municipal Corporation Recruitment : प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी असते. मात्र, आजच्या स्पर्धेच्या युगात सरकारी नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. यामुळेच अनेकजण पात्रता असूनही खासगी नोकरी करताना दिसतात. तुम्हीही सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच मुंबई महापालिकेने काही जागांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत पालिकेत कनिष्ठ लघुलेखक पदाची भरती होणार आहे.

पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज http://www.portal.mcgm.gov.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ही भरती एकूण 226 पदांसाठी असेल. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख याबद्दलची तपशीलवार माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

14 ऑगस्ट 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात. 4 तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संबंधित सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करताना कोणत्याही प्रकारची त्रुटी असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, हे उमेदवारांनी लक्षात ठेवावे.

एकूण रिक्त पदे – 226

पदाचे नाव – कनिष्ठ लघुलेखक (मराठी आणि इंग्रजी).

शैक्षणिक पात्रता-
कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी) या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी पास असणं आवश्यक आहे.
उमेजवाक 45 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
उमेदवाराकडे इंग्रजी टायपिंग 40 wpm आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 80 wpm आणि MS-CIT प्रमाणपत्रं आवश्यक आहे.
तर कनिष्ठ लघुलेखक (मराठी) या पदासाठी 10 वी, पदवी तसेच मराठी टायपिंग 30 WPM आणि मराठी स्टेनोग्राफी 80 WPM आणि MS-CIT

फडणवीसांना थेट नडणाऱ्या अ‍ॅड. उकेंचा पाय आणखी खोलात; पोलिसांनी उपसलं मोक्काचं हत्यार 

नोकरीचे ठिकाण – मुंबई.

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांचे वय 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार –
M15 (पे मॅट्रिक्स) पगार 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपये असेल.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन.

अर्ज शुल्क –
खुला वर्ग – रु. 1000
मागास/इतर मागासवर्गीय – रु. 900

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाइट – https://portal.mcgm.gov.in/

निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube