Download App

काँग्रेसने भाकरी फिरवली ! मुंबईच्या अध्यक्षपदी वर्षा गायकवाड, भाई जगतापांना हटविले

  • Written By: Last Updated:

Mumbai Congress : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर पक्षाचे पदाधिकारी ही बदलण्यात येत आहेत. त्यानुसार काँग्रेसने मुंबई अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांना हटविले आहे. त्यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची नियुक्ती केली आहे.

‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने हा निर्णय घेतला असून, अधिकृतपणे पत्र काढले आहे. यात गुजरातच्या प्रदेशाध्यक्षपदी खासदार शक्तीसिंह गोहील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुद्दुचेरी प्रदेशाध्यक्षपदी खासदार वैथिलिंगम यांची नियुक्ती केली आहे. आमदार वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या तिन्ही नियुक्त्या तात्काळ प्रभावाने करण्यात आल्या आहेत.

वर्षा गायकवाड यांचे वडिल एकनाथ गायकवाड हे खासदार राहिले आहेत.तेही मुंबईचे अध्यक्ष होते. वर्षा गायकवाड या धारावी विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आल्या आहेत. गायकवाड या सर्वसमावेशक, सर्वांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहेत. तसेच दलित आणि मुस्लिम मतदारामध्ये प्रभाव आहे. गायकवाड यांचा मुंबईत चांगला जनसंपर्क आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक, लोकसभा, विधानसभेसाठी वर्षा गायकवाड यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती महत्त्वाची आहे.


WTC Final: अजिंक्य रहाणेने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर, दणक्यात पुनरागमन, सर्वांची बोलती बंद

चार दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हे दिल्लीत गेले होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. त्यात महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदल करण्याचा चर्चा झाली होती. त्यानुसार मुंबईत बदल झाल्याचे बोलले जात आहे. तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पटोले यांचे पद ही धोक्यात आलेले आहे.

Tags

follow us