‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा

  • Written By: Published:
‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यामुळे भाजप-सेना युतीत मिठाचा खडा पडलाच… श्रीकांत शिंदे यांचा राजीनाम्याचा इशारा

Shrikant Shinde: एका पोलीस अधिकाऱ्यामुळे ठाणे-कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सध्या ठिणगी पडली आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत (shivsena) आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत घेतला होता. रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत आपण कार्यकर्त्यांच्या भावना जपणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून शिंदे यांनी देखील आता भाजपच्या काही नेत्यांना स्वार्थी असे म्हणत आपण भाजपा-शिवसेना युतीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे. तसेच वेळ पडल्यास आपल्या पदाचा राजीनामा देखील देऊ अशी भूमिका घेतली आहे. शिंदे यांची खासदारकीचा राजीनामा देण्याची म्हणजे शिवसेना व भाजपमध्ये मोठी दरी पडू शकते, अशी राजकीय चर्चा आहे.(shivsena-bjp-kalyan-loksabha-mp-shirkant-shinde-resignation-warning)

नरेंद्र मोदी यांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तिशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांची आहे.

Sharad Pawar Threat : धमकी प्रकरणावर शरद पवारांचं सडेतोड भाष्य, म्हणाले…

केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शिंदे यांच्या या भूमिकेमुळे शिंदे गट व भाजपमध्ये सर्वच आलबेल नाही हे स्पष्ट होत आहे. त्यात लोकसभेला शिंदे गटाला किती जागा मिळतील, याबाबत शंका उपस्थित होत आहे. त्यात भाजपने सर्व लोकसभा व विधानसभा जागांवर निवडणूक निरीक्षक नेमले आहेत. त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Nana Patole : कायदा व सुव्यवस्था राखणे जमत नसेल तर घरी बसा; पटोलेंचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

काय आहे वाद ?
कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकतीच भाजपची आढावा बैठक पार पडली. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीनिमित्ताने अभिनंदन ठराव मांडला. याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी जोपर्यंत पोलीस निरीक्षक शेखर बगाडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव मांडला. या उपस्थित सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि ठराव पारित करण्यात आला. रवींद्र चव्हाण यांनी देखील असा ठराव होणे म्हणजे फार गंभीर असल्याचे सांगत आपण कार्यकर्त्यांच्या भावना जपणार असल्याचे सांगितले होते. त्यावरून शिंदे यांनी देखील आता भाजपच्या काही नेत्यांना स्वार्थी असे म्हणत आपण भाजपा शिवसेना युतीसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे तसेच वेळ पडल्यास आपल्या पदाचा राजीनामा देखील देऊ अशी भूमिका घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube