Download App

चिकन डिश ऑर्डर केली, प्लेटमध्ये दिले उंदराचे मांस; मुंबईतील धक्कादायक प्रकरण

Mumbai crime : मुंबईतील वांद्रे परिसरात चिकन डिशमध्ये उंदराचे मांस आढळल्याने वांद्रे येथील पाप पेंचो ढाब्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे पोलिसांनी ढाब्याचे व्यवस्थापक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुराग सिंग हे आपल्या मित्रासोबत वांद्रे येथील पाली नाका येथील ढाब्यावर जेवायला गेले होते. त्यांनी रोटीसोबत चिकन आणि मटण थाळीची ऑर्डर दिली होती. जेवताना त्यांना थाळीमध्ये वेगळा दिसणारा मांसाचा तुकडा सापडला. त्यानंतर त्यांनी जवळून पाहणी केली असता तो उंदराच्या मांसाचा तुकडा असल्याचे समजले.

यानंतर अनुराग सिंगने ढाब्याच्या व्यवस्थापकाला विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. यानंतर अनुराग सिंग यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

भारताविरोधात घोषणाबाजी करणाऱ्यांना शिवेसेनेच्या युवा नेत्याने भर कोर्टात चोपले

तक्रारीवरुन पोलिसांनी शिकवेरा ढाब्याचे व्यवस्थापक विवियन अल्बर्ट आणि हॉटेलचे शेफ आणि चिकनचा पुरवठादार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर हे प्रकरण तापल्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीही हॉटेल गाठून चौकशी सुरू केली. अन्न व औषध प्रशासनही या प्रकरणाची चौकशी व तपास करत आहे.

अजितदादांनी घेतली नवाब मलिकांची भेट, दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करणाऱ्या शिंदे-फडणवीसांना चालणार का?

सहआयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले की, पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणात कोणता नवा ट्विस्ट येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Tags

follow us