पाच वर्षांत संपत्तीत तब्बल दहापट वाढ; पराग शहा सर्वात श्रीमंत उमेदवार

घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी अर्ज दाखल केला आहे. शहा राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत.

Parag Shah

Parag Shah

Mumbai News : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीसह अपक्षांनी अर्ज दाखल केले आहेत. घाटकोपर पूर्व (Mumbai News) मतदारसंघातून भाजपकडून पराग शाह यांनी  (Parag Shah) अर्ज दाखल केला आहे. या अर्जासोबत त्यांनी प्रतिज्ञापत्रही सादर केले आहे. त्यांच्या या प्रतिज्ञापत्रातून संपत्तीची माहिती समोर आली आहे. आजमितीस पराग शाह राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. शहा यांची स्वतःची २१७८.९८ कोटी रुपयांची तर पत्नीची ११३६.५४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यातील बहुतेक संपत्ती आणि अन्य गुंतणवुकीशी संबंधित आहे.

देशातील सर्वात श्रीमंत राज्य कोणते? महाराष्ट्राचा नंबर कितवा, वाचा सविस्तर..

मागील पाच वर्षांच्या काळात पराग शहा यांच्या संपत्तीत दहा पट वाढ झाली आहे. शहा यांच्या नावावरील संपत्तीचे मूल्य ३१ कोटी तर पत्नीच्या नावावरील मालमत्तेचे मू्ल्य ३४.१७ कोटी रुपये आहे. तसेच पराग शहा यांच्या पत्नीच्या नावावर ३६.९० लाख रुपयांचे कर्ज देखील आहे. २०१९ मधील पराग शहा यांची एकूण संपत्ती आणि आताची संपत्ती यांची तुलना केली तर शहा यांच्या संपत्तीत एकूण दहापट वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

२०१९ मध्ये पराग शहा यांनी स्वतःच्या नावावरील २३९ कोटी रुपयांची तर १६० कोटी रुपयांची संपत्ती पत्नीच्या नावावर जाहीर केली होती. कौटुंबिक संपत्ती २३ कोटी रुपयांची होती. स्थावर मालमत्तेचे मूल्य ३० कोटी आणि मालमत्तेचे मूल्य ३६.६४ कोटी रुपये होते.

मुंबादेवी मतदारसंघात भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. कारण, या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भाजपातून आलेल्या शायना एनसी यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे नाराज होत भाजपाचे दिग्गज नेते गोपाळ शेट्टी यांनी बंडखोरी केली आहे. भाजप नेत्यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना अपयश आले. या मतदारसंघातील शिवसेनेच्या तिकीटावर लढत असलेल्या शायना एनसी यांनी स्वतःकडे १७.४५ कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली आहे. तर त्यांचे पती मनीष मुनोत यांच्याकडे ३८.८९ कोटी रुपये आणि १८.३४ कोटी रुपयांची कौटुंबिक संपत्ती जाहीर केली आहे.

गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना गुंगीचं औषध दिलं होत; शिवसेना नेते संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Exit mobile version