‘आधी आईचा पाय घसरला, मग बाळ रेनकोटमधून पडले’; तान्हुलीच्या आजोबांनी सांगितला मन हेलवणारा प्रसंग

मुसळधार पावसामुळे 19 जुलै रोजी  मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना  आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना त्यांचा पाय अडखळला […]

Letsupp Image   2023 07 22T115800.543

Letsupp Image 2023 07 22T115800.543

मुसळधार पावसामुळे 19 जुलै रोजी  मुंबईची लोकल वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. अशात अंबरनाथ लोकल ठाकुर्ली-कल्याण दरम्यान खोळंबली असताना एक दुर्दैवी घटना घडली. 2 तासांपासून लोकल सुरु न झाल्याने चालत कल्याणच्या दिशेने जाताना  आजोबांच्या हातून 4 महिन्यांचे बाळ निसटून नाल्याच्या वाहत्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. तिचे आजोबा रुळांजवळून जात असताना त्यांचा पाय अडखळला आणि हे बाळ थेट वाहत्या नाल्यात पडले.

यादरम्यान, अचानक त्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातून चार महिन्यांचे बाळ निसटले अन् थेट नाल्यात जाऊन पडले. नाल्याच्या तीव्र प्रवाहात ते बाळ वाहून गेले. रेनकोटमधून बाळ कधी निसटून खाली पडले, ते कळलेच नाही, अशी हृदयद्रावक कहाणी बाळाच्या आजोबांनी सांगितली.

Letsupp Special : ‘माझं तिकीट फायनल, भाजपाला मस्का लावणार नाही’; जानकरांनी फुंकलं रणशिंग!

लोकल तब्बल दोन तास जागेवर उभी होती. त्यामुळे आजारी असलेल्या सहा महिन्याच्या बाळाला जरा वारा लागावा, यासाठी बाळाचे आजोबा आणि बाळाची आई लोकलमधून खाली उतरले. ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान आपल्या सहा महिन्याच्या बाळाला रेनकोटमध्ये गुंडाळून घेऊन जात असताना आधी बाळाच्या आईचा पाय घसरला. त्यामुळे आपल्या मुलीला सावरायला गेलेल्या वडिलांच्या रेनकोटमधून सहा महिन्यांची नात कधी नाल्यात पडती हे समजलेच नाही.

ट्रॅकवर चालत असताना आधी आपल्या मुलीचा पाय घसरल्यानंतर तिला कसेबसे सावरले. यादरम्यान माझ्या नातीला मी रेनकोटमध्ये गुंडाळून माझ्या हातात घेतले होते. मात्र माझाही पाय घसरला आणि माझ्या हातात असलेली माझी नात रेनकोटमधून कधी नात्यात पडली मला समजलेच नसल्याचे मुलीच्या आजोबांनी सांगितले. बाळ पडल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर रेनकोटमध्ये बाळ नसल्याचं आमच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत माझी नात नाल्यात वाहून गेली होती असं ज्ञानेश्वर पौगुल यांनी सांगितले.

Irshalwadi Landslide : 36 तासांची झुंज यशस्वी! मातीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या महिलेसाठी जवान ठरले ‘देवदूत’…

बाळ नाल्यात पडल्यानंतर लोकांनी आरडाओरड केल्यानंतर बाळ पडल्याचं त्यांच्या लक्षात आले. मात्र तोपर्यंत हे सहा महिन्याचं बाळ नाल्यात वाहून गेले होते. बाळ नाल्यात वाहून गेल्याचा धक्का पचवू न शकलेल्या आईने आपल्या बाळासाठी जागेवरच हंबरता फोडला.

Exit mobile version