Mumbai News : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता (Maharashtra Local Body Elections) निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळवण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यासाठी वॉर्डनिहाय आढावा घेऊन अहवाल सादर करण्याकसाठी जिल्हाशः पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आज केली.
या सदस्यांना 7 जुलै 2025 पर्यंत भाजप मुंबई कार्यालयात (BJP Mumbai) अहवाल सादर करावा लागणार आहे. आढावा घेण्यासाठी उतर मुंबई जिल्ह्याची जबाबदारी आमदार अतुल भातखळकर आणि आमदार योगेश सागर यांच्याकडे देण्यात आली आहे. तर उत्तर पश्चिम जिल्ह्याचा आढावा आमदार अमीत साटम आणि आ. विद्या ठाकूर घेणार आहेत.
उत्तर पूर्व जिल्ह्याचा आढावा आमदार मिहिर कोटेचा आणि माजी खासदार मनोज कोटक हे दोघे घेणार आहेत. उत्तर मध्य जिल्ह्याची जबाबदारी आमदार पराग अळवणी आणि आमदार संजय उपाध्याय यांच्याकडे देण्यात आली आहे. दक्षिण मध्य जिल्ह्याचा आढावा आमदार प्रसाद लाड आणि माजी आमदार सुनील राणे तर दक्षिण मुंबई जिल्ह्याचा आढावा मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) घेणार आहेत.
पालकमंत्रिपदाचा वाद भाजपाच्या पथ्यावर, शिंदेसेनेला रायगड; मनपा निवडणुकीआधीच मुंबई टिपणार
दरम्यान, आज निवडणूक संचलन समितीची ही घोषणा करण्यात आली आहे. यात एकूण 27 सदस्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये मुंबईतील आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आणि महिला, युवा मोर्चा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आल्याचे मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले. या समितीच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक प्रभागातील खडानखडा माहिती गोळा केली जाणार आहे. यंदा कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेची सत्ता मिळवायचीच असा भाजपाचा इरादा आहे.
या निवडणूक संचालन समितीचे अध्यक्ष आशिष शेलार आहेत. या समितीत मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार पियूष गोयल, आ. अतुल भातखळकर, आ. प्रविण दरेकर, आ. योगेश सागर (सरचिटणीस), आ. अमित साटम (सरचिटणीस), आ. संजय उपाध्याय (सरचिटणीस), सुनील राणे (सरचिटणीस), माजी खासदार मनोज कोटक, माजी खा. गोपाळ शेट्टी, आ. प्रसाद लाड, आ. मिहीर कोटेचा, आ. मनिषा चौधरी, आ. विद्या ठाकूर, आ. चित्रा वाघ, आ. राजहंस सिंह, भारती लवेकर, विजय गिरकर, कृपाशंकर सिंह, रवी राजा, भालचंद्र शिरसाट, प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा, आशा मराठे, तेजिंदर सिंग तिवाना आणि शीतल गंभीर-देसाई आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
Video : फडणवीसांना घरचा आहेर; मी मराठीतचं बोलणार, भाजप मंत्र्याचा हिंदी बोलण्यास थेट नकार