Download App

मुंबईत अग्नितांडव! भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू; झोपेतच काळाने गाठलं

पहाटेच्या सुमारास मुंबई शहरातील चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाला.

Tragic Fire in Chembur : पहाटेच्या सुमारास मुंबई शहरातील चेंबूर येथील (Tragic Fire in Chembur) सिद्धार्थ कॉलनीत एक हृदयद्रावक घटन घडली. येथे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेत दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही आग कशामुळे लागली याची खात्रीशीर माहिती अजून मिळालेली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन विभागाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Mumbai University Senate Election : मोठी बातमी! सिनेट निवडणुकांची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सर्वजण झोपेत असताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. या आगीत घरातील सात लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत एक सात वर्षांची मुलगी आणि दहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. या आगीत जखमी झालेल्यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथील डॉक्टरांकडून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. परंतु, नंतर या जखमींना मृत घोषित करण्यात आले.

घरातील मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. कुटुंबातील सर्व लोक झोपेत असल्याने आग लागल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. काही वेळातच आग सर्व घरात पसरली. या आगीत संपूर्ण कुटुंब होरपळून मृत्यूमुखी पडले. रविवार असल्याने सर्व कुटुंबीय जेवण करून गाढ झोपले होते. पहाटेच्या वेळी साखरझोपेत असताना ही घटना घडली. आग इतकी भीषण होती की काही कळण्याच्या आत सर्व घरालाच आगीने आपल्या कवेत घेतलं. त्यामुळे कुटुंबातील लोक जागे झाल्यानंतरही त्यांना घरातून बाहेर पडता आलं नाही.

दरम्यान, ज्या ठिकाणी आग लागली तो झोपडपट्टीचा परिसर आहे. या परिसरात अनेक वन प्लस वन पद्धतीची घरे आहेत. आगीत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबाची वन प्लस वन पद्धतीच झोपडी होती. या आगीत सर्व कुटुंबच नाहीसं झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी प्रशासनाने सुरू केली आहे.

धक्कादायक, पिकनिकला जाणाऱ्या स्कूल बसला आग, 25 जणांचा होरपळून मृत्यू

follow us