Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jarange) आजपासून मुंबईत उपोषण (Mumbai) आंदोलन सुरू होत आहे. लवकरच ते मुंबईत प्रवेश करतील. त्यांच्याबरोबर हजारो समाजबांधवही आहेत. आझाद मैदानात त्यांचे उपोषण सुरू होणार आहे. या मैदानात आधीच सतरा आंदोलने सुरू आहेत. मनोज जरांगे पाटील यांचे (Maratha Reservation) अठरावे आंदोलन आहे. या आंदोलनाची जय्यत तयारी समाजबांधवांनी केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही मदत देऊ केली आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून दोन लाख पाण्याच्या बाटल्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी दिली.
Manoj Jarange : आम्ही मुंबई बंद पाडायला चाललो नाही तर.. जरांगेंचे सरकारला रोखठोक प्रत्युत्तर
आझाद मैदानात याआधी सतरा आंदोलने सुरू आहेत. मात्र ही आंदोलने सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होत आहेत. आंतरशालेय क्रिकेटसाठी हे नियमित मैदान आहे. 25 एकर जमिनीवर या मैदानाचा विस्तार आहे. सन 2010 मध्ये मुंबईत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावर परवानगी देण्यात आली होती. मुंबईत आंंदोलनासाठी हेच एकमेव मैदान आहे. याच मैदानावर आज मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होणार आहे.
दरम्यान, काल लोणावळ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले होते, की मुंबई पोलिसांनी नोटीस दिली आहे. परंतु, आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही मुंबईकडे निघालो आहोत. जरांगे पाटील कोणत्याही नोटिसीला किंवा कारवाईला घाबरत नाहीत असे सांगितले. आझाद मैदानावर परवानगी मिळाली आहे. स्टेज आणि मंडप उभारण्याचेही काम तिथे सुरू आहे. माझे आताच तेथील लोकांशी बोलणे झाले आहे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस; गुणरत्न सदावर्तेंचा ‘मुंबईत’ येण्यास तीव्र विरोध
जरांगे पाटील पुढे म्हणाले, मला विनंती करायची आहे, आम्हाला तोडगा काढायचा आहे. आम्ही काय मजा करायला मुंबईला आलो नाही. मुंबईकरांचे आणि आमचेही हाल होऊ नये. यामुळे तोडगा काढा. समाजाच्यावतीने माझी विनंती आहे की मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस या तिघांनी चर्चा करावी. लगेच तोडगा काढावा. जुनं नवं शिष्टमंडळ येतं पण तोडगा निघत नाही. तिघांपैकी कुणीही एकाने यावं पण तोडगा काढावा असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.