Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज ठाकरे प्रचार (Raj Thackeray) सभा घेत आहेत. या सभांतून उद्धव ठाकरेंवर जोरदार (Uddhav Thackeray) टीका करत आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज ठाकरेंबाबत मोठा खुलासा केला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं असं कार्यकर्त्यांना नेहमीच वाटतं. मात्र मनसेसोबत (MNS) युती का नाही केली याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत दिलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे की मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे. मग महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल तर त्याला त्यांचा पाठिंबा असेल तर त्यांच्यासोबत माझी युती होऊ शकत नाही. माझं नातं महाराष्ट्राशी आहे. महाराष्ट्र लुटला जात आहे हे मी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. लुटारुंना मतदान म्हणजे मी महाराष्ट्राशी विश्वासघात करण्यासारखं आहे. त्यामुळे ज्यांनी महाराष्ट्राशी विश्वासघात केला त्यांच्यासोबत युती करणार नाही.
Uddhav Thackeray : आता मोदी गॅरंटी मिंधेंना पावणार का? उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल