Download App

Mumbai : स्वतःचंच अपहरण, वडिलांकडून खंडणीची मागणी; 30 हजारांसाठी मुलाचा प्रताप

Mumbai News :  पैशांसाठी कोण काय करेल याचा अंदाजच लावता येत नाही. आताही डोके चक्रावून टाकणारी अशीच एक घटना पालघर जिल्ह्यातून (Mumbai News) समोर आली आहे. पैशांची गरज होती म्हणून मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आणि चक्क वडिलांकडेच पैशांची मागणी केली. वडिलांना पैसे ऑनलाइन जमा करता यावेत यासाठी एक क्यूआर कोडही पाठवला. पोलिसांनीच या घटनेचा खुलासा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली असून याच घटनेची चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेत पोलिसांनी मुलाला बेड्या ठोकून त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.

पालघर पोलीस दलातील एका पोलीस अधिकाऱ्याने रविवारी या प्रकाराची माहिती दिली. एका 20 वर्षांच्या युवकाने आपल्या वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. या प्रकरणी वाळीव पोलिसांना वसई येथील फादरवाडी येथील रहिवाशाची तक्रार मिळाली. या तक्रारीनुसार संबंधित व्यक्तीचा मुलगा 7 डिसेंबर रोजी घरातून निघून गेला होता. पण तो घरी आलाच नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद केली.

देशातील पोलीस दलात केवळ 11.75 टक्केच महिला पोलीस; केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती

या प्रकरणाचा तपास केला जात असतानाच तक्रारदाराला त्याच्या मुलाचा फोन आला की तीन लोकांनी त्याचे अपहरण केले आहे. त्याला कोंडून ठेवले असून 30 हजार रुपयांची मागणी अपहरणकर्ते करत आहेत. जर पैसे दिले नाहीत तर ते मला मारतील असे मुलाने फोनवर सांगितले. इतकेच नाही तर पैसे ऑनलाइन जमा करण्यासाठी वडिलांच्या मोबाइलवर त्याने एक क्यूआर कोडही पाठवला. या प्रकारानंतर पोलीस अधिक सतर्क झाले. त्यांनी वेगाने तपास सुरू केला.

या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. या पथकांनी वसई, विरार, नालासोपारा आणि अन्य ठिकाणी शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधमोहिमेत अनेक गोष्टींची तपासणी केल्यानंतर मुलगा वसई फाटा परिसरात असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी मुलाला विचारले की तू असे का केले. त्यावेळी मुलाने सांगतले की त्याला पैसे पाहिजे होते पण वडिल पैसे देण्यास तयार नव्हते. या पैशांसाठी त्याने अपहरणाचा खोटा बनाव रचला. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले असून आधिक तपास केला जात आहे. या घटनेचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Pune News : ‘टास्क फ्रॉड’च्या जाळ्यात पुणेकर; तब्बल 27 कोटी रुपये गमावले

Tags

follow us