Download App

Mumbai Bomb Threat: मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलीस सतर्क

Mumbai Bomb Threat Call News In Marathi : गेल्या काही दिवसांपासून सतत मुंबई पोलिसांना (Mumbai Police ) धमकीचे फोन येत असल्याची माहिती समोर आली आहे. अशातत आता मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आहे. (Mumbai Bomb Threat) या मेसेजमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीकडून वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज देण्यात आला होता. संपूर्ण मुंबई शहरात 6 ठिकाणी बॉम्बस्फोट ठेवण्याचा मेसेज पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मेसेजनंतर मुंबई पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू आहे. ‘एएनआय’ने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांना याअगोदर देखील असे अनेक धमकीचे फोन आल्याचे समोर आले आहेत. याअगोदर पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला देखील धमकीचा मेसेज आला होता. गुरुवारी रात्री पुणे पोलिस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुणे हॉस्पिटल बॉम्बने उडवण्याचा मेसेज पाठवण्यात आला आहे. यामुळे पुना हॉस्पिटलची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पुना हॉस्पिटलमध्ये बॉम्ब स्निफर पथक देखील तैनात करण्यात आले होते. धमकीचा मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीची सध्या पोलिस कसून चौकशी करत आहेत.

मोठी बातमी! मुंबईत काँग्रेसला खिंडार; सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात जाणार

मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, याबाबत कोणीही घाबरू नये. याअगोदर देखील मुंबई पोलिसांना असे अनेक धमकीचे कॉल आणि मेसेज आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मुंबई दहशतवादी हल्ल्याची धमकी देणारा फोन देखील आला होता. मुंबई पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या. आता देखील मुंबई पोलिसांनी तपास केला असता, फोन करणाऱ्याने दारूच्या नशेत फोन केल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने दिलेल्या माहितीत तथ्य नसल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.

follow us