Mumbai Police issue notice to Paigambar Shaikh accused of inciting violent acts against BJP leaders : पैगंबर मोहिद्दीन शेख यांना सोशल मीडियावर व्यक्त होणं आता चांगलंच महागात पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात हिंसक कृत्य करण्यास चिथावणी देणारा मजकूर फेसबुकवरून प्रसारित केल्याच्या आरोपावरून पैगंबर मोहिद्दीन शेख यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
कांद्याचे दर कोसळले! आठवडाभरात 900 रुपयांची घसरण, लासलगाव बाजार समितीत काय आहेत नवे दर?
महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांविरोधात हिंसक कृत्यांना चिथावणी देणारा मजकूर प्रसारित केल्याची तक्रार प्रकाश रघुनाथ गाडे यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ३५ (३) अन्वये पैगंबर शेख यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रे आणि संबंधित उपकरणांसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तपासात सहकार्य करण्यासह पुराव्यांमध्ये कोणताही बदल किंवा छेडछाड करू नये, अशा सूचनाही पोलिसांनी दिल्या आहेत. त्यामुळे आता या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे लक्ष लागलं आहे.
