Mumbai Rain Alert : आज दुपारी अचानक मुबईसह (Mumbai) ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईकरांची पळापळ पाहायला मिळाली.
तर वादळी वाऱ्यामुळे मुंबईतील दोन ठिकाणी होर्डिंग कोसळल्याच्या घटना घडल्या त्यामुळे मध्य रेल्वेची (Central Railway) सेवा विस्कळीत झाली. होर्डिंग दुर्घटनेमध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांचा मुत्यू झाला आहे. या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जखमींचा उपचाराचा खर्च सरकार देणार आहे तर या दुर्घटनेमध्ये मुत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सरकारकडून देण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
वादळी वाऱ्यामुळे मुंलुंड आणि ठाणे दरम्यानचा ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. याच बरोबर घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बॅनर कोसळल्याने तीही वाहतूक काही काळातही ठप्प झाली होती. अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
वाहतूक विस्कळीत झाल्याने लोकल ट्रेनच्या रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. यामुळे रेल्वे स्टेशनवर गर्दीच गर्दी पाहायला मिळाली. पावसामुळे बराच वेळ लोकल ट्रेन बंद पडल्याने नागरिकांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणं पसंत केलं.
‘बारामतीचा ‘प्रसाद’ नगरकरांना मानवणार नाही’ रोहित पवारांवर विखे पाटलांचे टीकास्त्र
तर दुसरीकडे मध्य रेल्वेने वाहतूक विस्कळीत झाल्याची दाखल घेत तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मात्र लोकल ट्रेन कधी सुरु होणार याबाबत अद्याप काहीच अपडेट समोर आलेली नाही. यामुळे अनेक जण आता जमेल तास प्रवास करत आहे. आज दुपारपासून मुंबईतल्या प्रमुख भागांत धूळ आणि पावसाचं साम्राज्य दिसून येत आहे.