Download App

Mumbai Rain; पाणी साचल्याने अंधेरी मेट्रो बंद, पहिल्याच दिवशी मुंबईकरांची तारांबळ

Mumbai Rain : राज्यांतील अनेक भागात मान्सूनचे दणक्यात अगमन झाले आहे. प्रदीर्घ विलंबानंतर आज (शनिवारी) अखेर मुंबईतही मान्सूनने दाखल झाला आहे. शहरात एवढा मुसळधार पाऊस झाला की पहिल्याच दिवशी मुंबईकरांची अवस्था दयनीय झाली.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले होते. सध्या मुंबईतील पावसाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जो अंधेरीचा आहे. अंधेरीमध्ये पाणी साचल्याने अनेक वाहने भुयारी मार्गात अडकल्याचे दिसून आले.

अंधेरीत जास्त पाणी तुंबल्याने मेट्रोही बंद ठेवावी लागली. त्याचवेळी परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना घराकडे जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि वाहतूक पोलिसांनी देखील वाहतूक सल्ला जारी केला आहे. पोलिसांनी लोकांना पावसात सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

Forest Guard Recruitment 2023: वन विभागात हजारो पदांसाठी जागा, अंतिम तारीख संपण्यापूर्वी अर्ज करा

वाहतूक पोलिसांचा इशारा
1) मुंबईत शनिवारी झालेल्या संततधार पावसामुळे पाणी साचल्याने अंधेरी भुयारी मार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि वाहतूक पोलिसांनी दिली.
2) अंधेरी पूर्वेतील असल्फा साकीनाका जंक्शन येथे पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली होती, असे मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले.
3) पाणी साचल्याने बीडी रोड, महालक्ष्मी मंदिर या मार्गावर वाहनांची वाहतूक मंदावली असल्याचेही अॅडव्हायझरीत म्हटले आहे.
4) वरळी सीलिंक गेटजवळील गफार खान रोडवर पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई तसेच पालघर आणि ठाणे या लगतच्या भागांसाठी 26 आणि 27 जूनसाठी पिवळा अलर्ट जारी केला आहे. हा इशारा त्या तारखांमध्ये अतिवृष्टीची शक्यता दर्शवितो.

Tags

follow us