School Closed in Mumbai : मुंबई अन् उपनगरातील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी…

राज्यात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरु असून भारतातल्या काही भागांत तर पावसाने धुमाकूळच घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल […]

Maharashtra Rain

Maharashtra Rain

राज्यात सध्या जोरदार पावसाची बॅटींग सुरु असून भारतातल्या काही भागांत तर पावसाने धुमाकूळच घातल्याची परिस्थिती दिसून येत आहे. अशातच महाराष्ट्रातल्या कोकण भागातंही पावसाचा हैदोस सुरु असून पुढील काही दिवसही अशीच अतिवृष्टी राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई शहरासह उपनगरातील शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी घेतला आहे.

महाविद्यालयांनाही सुट्टी :
मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाविद्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबद्दल शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत माहिती दिली.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

मुंबईत आज रात्रापासून ते उद्या दुपारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेत मुंबई महानगरमधील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

यासोबतच मुंबईकरांनी आवश्यकता असेल तरच घराच्याबाहेर येण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. यासोबतच मुसळधार पावसात स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई स्कूल बस असोशिएनने घेतला आहे. यासंदर्भात पालकांनाही कळवण्यात आलं आहे.

Exit mobile version