राज्यावर असलेलं कोरोनाचं सावट निस्तरत नाही तोवरच आता झिकाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील कुर्ला परिसरात एक 15 वर्षीय मुलगी झिकाबाधित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यातीला आरोग्य पुन्हा अलर्ट झाली असून मुंबईकरांमध्ये एकच भीती निर्माण झाली आहे.
Rockstar DSP On Teachers Day: शिक्षक दिनानिमित्त रॉकस्टारने मानले खास व्यक्तीचे आभार !
झिकाबाधिक 15 वर्षीय मुलीला अनेक दिर्घकालीन आजार आहेत, मुंबईतील चेंबूर भागात पहिल्यांदाच झिकाचा रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आता दुसरा रुग्ण आढळून आला आहे. झिकाबाधित मुलीला गेल्या 20 ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होता, अगोदर तिने खाजगी रुग्णालयात उपचार घेतले होते.
Maratha Andolan : ‘ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही’; वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
मात्र, मुलीला झिका झाल्याचं समजल्यानंतर तिला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तसेच मुंंबई महाापालिकेकडून ती राहत असलेल्या भागातील घरांचे सर्वेक्षण सुरु केले आहे. आरोग्य विभागाच्या या सर्वेक्षणात नवीन रुग्ण अथवा संशयित रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णाच्या इमारतीच्या परिसरात एडीज डासोत्पत्ती आढळली. तेथे डास नियंत्रण उपाययोजना राबविण्यात आली आहे.
अजितदादांना भाजपने बरोबर का घेतले ? पंकजा मुंडेंनी लोकसभेचे गणित मांडले
दरम्यान, झिका हा रोग हा झिका विषाणूमुळे होणारा सौम्य आजार आहे. हा आजार संक्रमित एडिस डासांमुळे पसरतो. एडिस डास डेंग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचाही प्रसार करतात. हा आजार विषाणूजन्य असला तरी कोविड सारखा वेगाने पसरत नाही.
झिका विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींपैकी ८० टक्के व्यक्तींना लक्षणे नसतात. ज्यांना इतर आजार आहेत त्यांना गंभीर संक्रमण होण्याची शक्यता असते. अशा रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासू शकते.