Download App

मुंबईतील टोल बंद होणार का? राज ठाकरे यांच्या धमक्यांना मुख्यमंत्री बधले नाहीत

  • Written By: Last Updated:

मुंबई : मुंबई आणि राज्यभर असलेल्या टोलवसुलीच्या विरोधात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) यांची भेट घेतली. टोलची रक्कम जाते कुठे? मनमानी पद्धतीने टोलवसुली केली जाते. यासह अनेक मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केले. ठाण्यात सुरू असलेल्या उपोषण सांगता वेळी राज ठाकरे यांनी टोलबंद करा अन्यथा टोल नाके जाळू असा इशारा दिला होता. टोलबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. या भेटीत काय निर्णय होतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आमदार अपात्रतेची पुढील सुनावणी 20 तारखेला, आजच्या सुनावणीत काय-काय झालं?

राज ठाकरे यांनी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी किती वाहने टोलवरुन जातात, टोलची किती रक्कम बाकी आहे ? रोज किती रक्कम वसूल होते? याचे बोर्ड का लावले जात नाही? टोलवर नागरी सुविधा का दिल्या जात नाही याकडे लक्ष वेधले. मुंबईतील प्रवेशावर टोल आणि महामार्ग यावरील टोल बंद करण्याविषयी भूमिका मांडली. मुंबईतील इंट्री टोल हे आज नाही. तर 2000-2001 या वर्षात दिले गेले आहेत. यातील कंपनी आणि कर्ज देणाऱ्या बँका असे करार आहेत. ते आता रद्द करता येणार नाहीत. असा निर्णय झाला तर त्याचा अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुंतवणुकीवर त्याचा परिणाम होईल हे मुख्यमंत्री यांनी सांगितले. टोलमधून जमा होणारा पैसामधूनच मुंबईत ठिकठिकाणी रस्ते होत आहेत. त्यामुळे टोलचा पैसा कुठे जातो हा प्रश्न निकाली काढला.

नगरमध्ये शाळेच्या परिसरातच मटक्याचा अड्डा! काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या स्टिंग ऑपरेशन नंतर पोलिसांची कारवाई

राज ठाकरे यांचे समाधान?

मुख्यमंत्री यांनी टोलबंद होणार नाहीत, ही टोलबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर राज ठाकरे आणि शिष्टमंडळाकडून यावर काय भूमिका घेतली जाते. या कडे लक्ष लागले होते. पण यावर कुठलाही आक्रमक पवित्रा मनसेकडून दिसला नाही. मुंबईत मुलुंड टोलनाक्याच्या परिसरात राहणारा दहा हजारांवर नागरिकांना नाहक टोल भरावा लागतो. हा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. नागरिकांना टोलमधून सूट देता येणार नाही. हे मुख्यमंत्री यांनी सरळ सांगितले. पण या नागरिकांसाठी मुंबईला जोडणाऱ्या नाल्यावर पूल बंधुन दिला जाईल. जेणे करुन या भागातील नागरिकाना टोल भरावा लागणार नाही. पण या नाल्यावर पूल कधी होणार हे मात्र निश्चित होऊ शकले नाही. गेले अनेक वर्ष टोलबाबत आंदोलन करणारे राज ठाकरे आणि मनसैनिक यांचे समाधान झाले का ? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

Tags

follow us