एकनाथ खडसेंना मोठा दिलासा! भोसरी भूखंड गैरव्यवहारप्रकरणी जामीन मंजूर
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात (Bhosari land scam case)राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे Eknath Khadse यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.
‘देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तर आम्हाला….’; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने आमदार एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा दिला आहे. आमदार खडसे यांच्या विरोधात ईडीने भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने एकनाथ खडसे यांना जामीन मंजूर केला आहे.
‘ससून’ ड्रग्ज रॅकेटप्रकरण: अखेर सरकारला आली जाग, चौकशीसाठी समिती नेमली
यापूर्वीच एकनाथ खडसे यांना न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला होता. आज पार पडलेल्या सुनावणीत खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला आहे.
भोसरी जमीन घोटाळा प्रकरण आहे तरी काय?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे यांनी भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
या भूखंडाची मूळ किंमत 31 कोटी रुपये असताना त्याची विक्री फक्त 3.7 कोटी रुपयांना झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हेमंत गावंडे यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
भूखंडाचे मूळ मालक अब्बास उकानी हे होते. एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांनी हा भूखंड खरेदी केला होता. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची नोंदही करण्यात आली होती.