Mumbai Toll Rate : मुंबईत प्रवेश करताना आता वाहनचालकांच्या खिशाला झटका बसणार आहे. मुंबईतील पाच एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Mumbai Toll Rate) वाढविण्याचा निर्णय झाला आहे. 1 ऑक्टोबरपासून टोल दरात 12.50 ते 18.75 टक्के वाढ होणार आहे. दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड, ऐरोली खाडी पूल आणि वाशी हे मुंबईतील पाच प्रवेश बिंदू आहेत.
हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कार यांच्यासाठी एकेरी टोल 5 रुपये वाढणार आहे. मिनी बससाठी टोल दरात 10 रुपये वाढ होणार आहे. मिनी बसचालकांना आधी 65 ते 75 रुपये द्यावे लागत होते. ट्रक आणि बससाठी 150 रुपये तर मल्टी एक्सल वाहनांसाठी 190 रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. या एन्ट्र पॉइंट्सवर सन 2002 पासून टोल घेतला जात आहे. याआधी ऑक्टोबर 2020 मध्ये टोलदरात सुधारणा करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील दरवाढ ऑक्टोबर 2026 मध्ये होईल.
Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले…
यातच आता 2026 नंतर दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड आणि ऐरोली खाडी पूल येथे टोल आकारणी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टोल बंद झाला तरी ठाणे खाडू पुलाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी येथे टोल सुरू राहिल अशी शक्यता आहे. दरम्यान, 1 ऑक्टोपबरपासून नवीन दराने टोल आकारणी केली जाणार असून हे सुधारीत दर पुढील ऑक्टोबर 2026 पर्यंत कायम राहतील असे सांगण्यात आले.
मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे. एमएमआर भागातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी 2002 ते 2027 या 25 वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार कार जीपसारख्या वाहनांना एकेरी प्रवासासाठी पाच रुपयांची वाढ झाली आहे.
Bombay Dyeing Land deal : 22 एकर जमिनीची 5200 कोटींना विक्री, कोणी केली जागा खरेदी?