Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले…

Ajit Pawar : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? अजित पवारांनी दिलं ‘सेफ’ उत्तर, म्हणाले…

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार यांनी सेफ उत्तर देत आपली प्रतिक्रिया दिली. त्याच बरोबर त्यांनी असं देखील म्हटलं की, निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल.

Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

काय म्हणाले अजित पवार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर निवडणूक आयोगाच्या राष्ट्रवादी खरी कुणाची असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले. निवडणूक आयोगासमोर प्रत्येक जण भूमिका जाहीर करत असतात. त्यात आमची बाजू कशी उजवी आहे? ते सांगण्यात येईल. पण निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सुनावणीसाठी बोलावले आहे. यामध्ये शरद पवार आणि अजित वपार गट आपल्या भूमिका मांडतील. खरा पक्ष आमचाच असल्याचा दावा करतील. याच संदर्भात प्रश्न विचारला असता अजित पवारांनी म्हटले की, त्यात आमची बाजू कशी उजवी आहे? ते आम्ही मांडू. मग निवडणूक आयोग जो निर्णय देईल. तो निर्णय देतील मान्य करावा लागेल.

Ajit Pawar : अजितदादाही होतात ट्रोल! स्वतःच सांगितलं नेमकं काय घडलं?

त्याचबरोबर यावेळी त्यांनी कंत्राटी भरतीवर देखील सरकारची भूमिका स्पष्ट केली. विरोधकांच्या आरोपांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये. असं आवाहन केलं. ते म्हणाले की, काही काही ठिकाणी ताबडतोब माणसे लागतात. मागच्या सरकारमध्ये काय घडलं ते सगळ्यांसमोर आहे. मात्र आज ते सरकारमध्ये नाही तर आमच्या विरोधात पावत्या फाडल्या जातात. डॉक्टरांची भरती असेल इतर भरती असेल रेग्युलर जागा भरेपर्यंत हा तात्पुरता निर्णय घेतला आहे.

तर कंत्राटी भरतीच्या जीआरबद्दल गैरसमज झाला आहे. कारण नसताना मला ट्रोल करत आहेत. तसेच राज्यात १.५० लाख लोकांची भरती होणार आहे. सगळ्यांना मला सांगायचे आहे की, आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि वेगळ्या बातम्या पसरवतात. जीआर कायम राहणार कारण अनेक जण निवृत्त होत असतात आणि नंतर भरती नाही झाली तर आमच्याकडे लोकं येतात आणि प्रश्न विचारतात. त्यामुळे असे निर्णय घेणे गरजेचे असते. असं यावेळी अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube