Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Munna Bhai 3 चे शूटिंग सुरू? संजय दत्त-अरशद वारसीचा सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Sanjay Dutt and Arshad Warsi Reunited: ‘मुन्ना भाई एम बी बी एस’ हा सिनेमा नक्कीच तुमच्या लक्षात असणार आहे. या सिनेमाने संजय दत्तला जीवनदान दिले असे म्हणायला काय हरकत नाही. (Sanjay Dutt) या सिनेमातील मुन्नाभाई आणि सर्किट ही जोडी चाहत्यांनी चांगलीच आवडली होती. (Munna Bhai 3) या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केल्याचे बघायला मिळाले होते. आज देखील या जोडीला एकत्र बघण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकत आहे. तर ‘मुन्नाभाई ३’ची वाट बघत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Movie Talkies (@movietalkies)


२००६ साली ‘लगे राहो मुन्नाभाई’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. सिनेमा प्रदर्शित होऊन जवळपास १७ वर्ष झाली आहेत. परंतु सर्किट आणि मुन्नाभाईची क्रेज देखील आज देखील तसेच आहे. चाहत्यांना ही जोडी पुन्हा रुपेरी पडद्यावर बघायची आहे. सर्किट आणि मुन्नाभाईच्या चाहत्यांसासाठी एक मोठी आनंदाची माहिती आहे.संजय दत्त आणि अरशद वारसी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये ‘मुन्नाभाई’ सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी देखील बघायला मिळत आहेत.

संजय दत्त आणि अरशद वारसी यांच्या धुमाकूळ घालत असलेल्या व्हिडीओ संजय दत्त आणि राजकुमार हिरानी बोलत बोलत चालत जात असल्याचे आहे. तसेच अरशद वारसी येत असल्याचे देखील दिसत आहे. संजय दत्तने ऑरगे रंगांचे शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घातली आहे. अरशद वारसी हे काळे कपडे आणि गळ्यात चैनी घातले आहे. दोघेही त्यांच्या मुन्ना आणि सर्किटच्या गेटअपमध्ये या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहेत. त्यांच्या आजूबाजूला शूटिंग चालू असल्याचे दिसत आहे. तर त्यांच्या मागे मेडिकल देखील आहे. यामुळे हे शूट हॉस्पटिलमध्ये होत आहे. या व्हिडीओच्या पाठीमागे आवाज देखील येत आहे. मुन्नाभाईमधील टायटल ट्रक सुरू आहे.

Pathaan नंतर सिद्धार्थ आनंद पुन्हा सज्ज; दीपिका-हृतिकला आणणार पहिल्यांदा एकत्र

अरशद विषारी देखील मोठ्या आवाजाने काहीतरी बोलत आहे. तसेच पाठीमागून आवाज येत ‘मुन्ना परत आला.’ तर व्हिडीओमध्ये राजकुमार हिरानी म्हणत आहेत, ‘अखेर आपण एकत्र आलो. या व्हायरल व्हिडीओवर चाहते देखील ‘मुन्ना भाई 3’ बघायला मिळणार यासाठी उत्सुक होत आहेत. परंतु ‘मुन्ना भाई 3’ची निर्मिती सुरू असल्याची चर्चा पहिल्यांदा होत नाही. ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ अनेकवेळा  या सिनेमाची चर्चा होत असते. संजय दत्त आणि अरशद वारसी ‘मुन्नाभाई ३’च्या आधी ‘वेलकम बॅक टू द जंगल’मध्ये एकत्र बघायला मिळणार आहे. ‘वेलकम’ आणि ‘वेलकम 2’च्या या सिक्वेलमध्ये अक्षय कुमार, परेश रावल, जॅकलिन फर्नांडिस, दिशा पटानी, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, रविना टंडन असे अनेक हटके कलाकार बघायला मिळाले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube