Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस-अजितदादा सरकारसह उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani)यांच्यावर घणाघाती टीका केली. आज शनिवारी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धारावी ते बीकेसी येथील अदानी उद्योग समूहाच्या ऑफिसपर्यंत मोर्चा काढला.
राम शिंदेंपाठोपाठ अजितदादांचे आमदार जगतापांना आश्वासनांचे पाठबळ
धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विविध मुद्द्यांवरुन ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. यावेळी ठाकरेंनी तुम्ही अदानींचा बूट का चाटता? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
Jacky Shroff ला चाहत्यांचा ह्रदयाचा ‘हिरो’ बनवणाऱ्या ‘हिरो’ ला 40 वर्ष पूर्ण
सरकारने मध्यंतरी एक कार्यक्रम सुरु केला होता, सरकार आपल्या दारी, पण हे सरकार अदानीच्या दारी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. धारावीतल्या ओढे, नाले, गटारं येईल नाही त्या सर्वांचा एफएसआय, टीडीआर अदानीला देऊन टाकला फक्त पाऊस पाडणाऱ्या ढगांचा नाही.
त्यावर आम्ही म्हटलं की, बिना ढगांच्या सवलतीचा पाऊस इतका पाडला आहे की आणखी ढगांची गरज काय? असे म्हणत देवेंद्र आणि कंपनी म्हणतंय म्हणजे, संजय राऊत यांनी मागेच सांगितलं की, भारतीय जुगारी पार्टी. ते बाजू मांडताहेत की, उद्धव ठाकरे टीडीआर लॉबीची बाजू घेत आहेत. मग तुम्ही भाजपचे जे बूट चाटताहेत ते का चाटताहेत? असा सवालही यावेळी उद्धव ठाकरेंनी सरकारला विचारला.
त्याचवेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण मुख्यमंत्री असताना असा एकही निर्णय दाखवून द्या की, जो माझ्या नागरिकांना बाजूला ठेवून फक्त बिल्डरांसाठी दिला. पण बिल्डरधार्जिने तुम्ही आहात, असे म्हणत ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.
हा लढा आता फक्त धारावीचा राहिलेला नाही तर तो मुंबईचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा झालेला आहे. कारण या सवलती ज्या आहेत, मुद्रांकशुल्क माफ हे माफ. याचा परिणाम जो आहे तो महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणार असल्याचेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आज केवळ मुंबईचं रस्त्यावर उतरली आहे. वेळ पडली तर, संपूर्ण महाराष्ट्र धारावीत पोहोचवेन. ज्यांनी अदानींची सुपारी घेतली त्यांनी हा अडकित्ता लक्षात ठेवावा असं म्हणत याच अडकित्त्याने तुमची दलाली चेचून चेचून टाकू जेणे करून तुम्ही पुन्हा अदानीचे नाव घेणार नाही.
50 खोके कमी पडले म्हणून या बोक्यांची नजर आता धारावीकडे वळली असल्याचा दावाही ठाकरेंनी यावेळी केला. हे सरकार आपल्या दारी नाही तर, अदानीच्या दारी असल्याचं ठाकरे म्हणाले. आज माझ्यासोबत सर्व पक्ष एकवटले असून, मुंबईवर जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा पहिल्यांदा शिवसैनिक धावतो असेही ठाकरे म्हणाले.