Download App

महिला PSI घरात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; मुंबईतील घटना

  • Written By: Last Updated:

Mumbai woman sub-inspector dead body found in house : मुंबईतील नेहरू नगर पोलीस स्टेशनमध्ये सेवेत असलेल्या एका महिला पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेह (Dead body of female sub-inspector of police) त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शीतल एडके (Sheetal Adke) असे या मृत पोलीस उपनिरीक्षक महिलेचे नाव आहे. शीतल एडके (35) या गेल्या दीड वर्षांपासून आजारी रजेवर होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल एडके या मुंबईतील नेहरू नगर परिसरात भाड्याच्या घरात राहत होत्या. त्या मूळच्या नगर येथील रहिवासी होत्या, अशी माहिती आहे. शितल ह्या अविवाहित होत्या. मागील एक-दीड वर्षांपासून त्या सीक रजेवर होत्या. एक वर्षापेक्षा अधिक काळ ड्युटीवर त्या गेल्या नाहीत. त्यामुळं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील करण्यात आली होती. नेहरू नगर मधील सोसायटीमध्ये त्या 5 व्या मजल्यावर वास्तव्याला होत्या. त्यांच्या घरातच शीतल या मृतावस्थेत होत्या. त्यामुळं मागील 2-3 दिवसांपासून त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येत होती.

Operation Kaveri : सांगलीतील 100 जण सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी कुटुंबीयांची पवारांकडे विनंती

त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी याबाबची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता शीतल एडके यांचा मृत अवस्थेत आढळून आल्या.

प्राथमिक तपासात शीतल एडके यांचा मृत्यू 3-4 दिवसांपूर्वी झाला असून त्यांनी ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी मानलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती झोन 6 चे डीसीपी हेमराज राजपूत यांनी सांगितलं. दरम्यान, आता पोलिसांनी एडके यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम करण्यासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

 

 

Tags

follow us