Operation Kaveri : सांगलीतील 100 जण सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी कुटुंबीयांची पवारांकडे विनंती

Operation Kaveri : सांगलीतील 100 जण सुदानमध्ये अडकले, सुटकेसाठी कुटुंबीयांची पवारांकडे विनंती

Sangli People in Sudan : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान तेथील भारतीय भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यात सांगली जिल्ह्यातील 100 जण अडकले होते.

सांगलीतील सुदानमध्ये अडकलेले हे 100 लोक तेथील केनाना शुगर कंपनीत कामाला होते. ते सांगलीतील वेगवेगळ्या तालुक्यातील आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनी ही बाब राष्ट्रवादीचे आमदार अरूण आण्णा लाड यांना आणि शरद पवारांना सांगितली. केनाना शुगर कंपनी ही सुदानमधील भारतीय दुतावासापासून 1200 किलोमीटर दूर आहे. असं तेथील भारतीयांनी सांगितलं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा जीव टांगणाला लागला आहे.

Operation Kaveri : सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल, परराष्ट्र मंत्रालायाची माहिती

दरम्यान भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामध्ये आता सुदानमधील 360 भारतीय दिल्लीत सुखरुप दाखल झाले आहेत. याबद्दल परराष्ट्र मंत्रालायाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत माहिती दिली. मात्र केनाना शुगर कंपनी ही सुदानमधील भारतीय दुतावासापासून 1200 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे या लोकांना युद्धजन्य परिस्थितीमध्ये दुतावासापर्यंत पोहचणं कठीण आहे. त्यांनी त्यांची सुटका करण्याची विनंती भारतीय दुतावासाला केली आहे.

सुदानमध्ये 4 हजारहून अधिक भारतीय राहतात. लष्कर आणि निमलष्करी दले यांच्यातील लढाईमुळे सुदानमध्ये सध्या हिंसाचार होत आहे. तर 3 हजारहून अधिक भारतीय या देशात अडकल्याचं सांगण्यात येत आहे. तर त्यांची सुटका करण्यासाठी सुदान मधील भारतीयांना सौदीची राजधानी जेद्दाहला जहाजाना आणावं लागत मग हवाई मार्गाने मायदेशी आणावं लागत आहे. आतापर्यंत पाच तुकड्यांमध्ये एकूण 967 भारतीयांना सुखरुप परत आणण्यात आलं आहे. सर्व देशांच्या नागरिकांना मायदेशी नेता यावं म्हणून सुदानमध्ये तीन दिवस युद्धबंदी घोषित करण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube