Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात सध्या छगन भुजबळांच्या नाराजीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असताना आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. ही बातमी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीत नाराजीनाट्य सुरू असतानाच ही बातमी आल्याने खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार नॉट रिचेबल झाले आहेत. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी अजितदादा गैरहजर राहिले. त्यामुळे अजित पवार नेमके गेले तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Winter Session : नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत. अधिवेशन सोडून नाशिकला रवाना होणार असल्याची माहिती आहे. येथे येऊन समता परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांशी भुजबळ चर्चा करणार आहेत. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज असल्याचे त्यांनी कालच सांगितले होते. इतकेच काय तर पक्षप्रमुख अजित पवार यांनाही काहीच बोललो नसल्याचे भुजबळ म्हणाले होते.
या घडामोडी घडत असतानाच अजित पवारही संपर्काच्या बाहेर गेल्याची माहिती समोर आली आहे. मागील चोवीस तासांपासून अजित पवारांचा कुणाशीही संपर्क झालेला नाही. हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. मात्र आजही अजित पवार हजर राहिलेले नाहीत. त्यामुळे विविध प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार कुठे गेले आहेत याचे उत्तर त्यांच्या आमदारांकडूनही दिले जात नसल्याने सस्पेन्स वाढला आहे.
रविवारी मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार हजर होते. त्यानंतरच्या चहापानाच्या कार्यक्रमालाही त्यांची हजेरी होती. यानंतर मात्र त्यांची कुणाशीही भेट झाली नसल्याचे सांगितले जात आहे. छगन भुजबळ नाराज असताना अजित पवार कुणालाही भेटले नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांना भेटण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दादा बंगल्यावर नाहीत असं सांगितलं जात आहे. पण अजित पवार नेमके कुठे गेले आहेत याचा खुलासा होताना दिसत नाही.
पवार एकत्र आले तर शिंदेंची गरज संपेल कशी?; अजित पवार-शरद पवार भेटीमागचे नेमके संकेत काय?