ठाणे : सध्या राज्यात शहराची आणि रस्त्यांची नावे बदलण्याचे सुरु आहे मागच्या आठवड्यात औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहराची नावे बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे करण्यात आले आहे. तसेच आता अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याची मागणी जोर धरीत आहे. अशातच आता ठाण्यातील घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करावे अशी मागणी अभिनेता मुकेश खन्ना यांनी केली आहे. त्यांनी हि मागणी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना संग्राम फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन केली आहे.
ठाणे शहर म्हणजे महाराष्ट्राची दुसरी सावंस्कृतिक राजधानी ठाणे शहराला अनेक वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. इथे पोर्तुगीजांपासून इंग्रजांच्या काळातील अनेक वास्तू आजही पाहायला मिळतात. मराठांनी जिकललेली अनेक किल्ले देखील आज ठाण्यात पाहायला मिळतात याच उद्देशाने घोडबंदर रस्त्याचे नाव बदलून ‘वीर चिमाजी आप्पा मार्ग’ करण्याची मागणी होत आहे.
Eknath Shinde मराठा आरक्षणासाठी ॲड. हरिष साळवे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स
वीर चिमाजी आप्पा कोण आहेत…
वीर चिमाजी आप्पा हे एक ऐतिहासिक पुरुष होते त्यांनी अनेक लढाया जिकल्या आहेत. आपल्या तलवारीने त्यांनी शत्रूंना धारातीर्थ पाडले आहे. वीर चिमाजी आप्पा यांनी लढाया लढून अनेक गड किल्ले पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडून घेतले आहेत. त्यांनी एक वीर योद्धा म्हणून देखील ओळखले जाते.