Download App

Naresh Mhaske चं नवं ट्विट ! आले की नै मुद्द्यावर? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? होतेय व्हायरल

मुंबई : ‘आले की नै मुद्द्यावर ? म्हणतात, कोण होतं तेव्हा हुद्द्यावर ? ज्यांच्यासाठी तुम्ही आपला, हिंदुत्वाचा विचार सोडला, तुमच्या जीवावर जो पक्ष हवेमध्ये उंच उडला, तेच आता उलटलेत बघा, तुमच्यावर आळ घेतायत बघा… असे म्हणत शिंदे गटाचे (Shinde group) ठाण्याचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी ठाण्यामध्ये फुटीचे संकेत दिले आहेत. तसेच टप्प्याटप्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार. असेही म्हस्के यांनी ट्विट (Tweet) करत म्हटले आहे. आणि त्यांच्या आता या नवा ट्विट व्हायरल (Tweet viral) होत आहे.

यामध्ये त्यांनी ‘सक्षम तुम्ही नव्हता म्हणून, आघाडीची बिघाडी झाली, म्हणून म्हणे त्यांच्यावर सत्ता जायची वेळ आली, आता तरी जागे व्हाल? झाल्यातून काही धडा घ्याल? का अजून माझंच खरं, म्हणून हेका चालू ठेवाल? नरेश म्हस्के पुढे म्हणाले, आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या जाचाला आणि त्यांच्या चांडाळ चौकडीच्या कंपूशाहीला कंटाळून प्रामाणिक नगरसेवक आमच्याबरोबर येत आहेत. टप्प्याटप्याने संपूर्ण राष्ट्रवादी रिकामी होणार. आव्हाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नये. आतापर्यंत तुम्ही जे ठाण्यात काम करू शकलात ते केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच. याचे भान ठेवा.

यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. ठाण्याचे माजी ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे आणि त्यांचे 4 सहकारी असे एकूण 5 माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्यातच म्हस्के यांच्या ट्विट व्हायरल झाल्याने स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे असे झाले तर ठाण्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. 12 फेब्रुवारीला हणमंत जगदाळे आणि इतर 4 जण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत. असेही म्हटले जात आहे.

यावर संजय राऊतांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे सरकार पडून आता ८ महिने उलटले आहे. मात्र अद्यापही हे सरकार कोणामुळे पडलं यावरुन महाविकास आघाडीतच आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी हे सरकार पडण्यासाठी विधानसभेचे तत्कालिन अध्यक्ष आणि काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जबाबदार धरलं होतं. त्यांनी राजीनामा दिला नसता तर भाजपने संधी साधली नसती, असं म्हणतं त्यांनी पटोलेंवर निशाणा साधला होता. दरम्यान, यावर आता पटोले यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.

नाना पटोले म्हणाले, मी संजय राऊत यांना धन्यवाद देतो की ते मला एवढे शक्तिशाली समजतात, की मी राहिलो असतो तर खोक्याचं सरकार आलं नसतं. मी असतो तर महाविकास आघाडीचं सरकार पडलं नसतं, अशा प्रकारचं वक्तव्य करुन ते माझ्या शक्तीची जाणीव करुन देत आहेत. माझ्या शक्तीचा परिचय त्यांनी देशाला करुन दिला. पण जे कोणी पक्षाचे त्या खुर्चीवर बसलेले होते, तो पक्ष कमजोर होता का, त्यांचं नेतृत्व कमी पडत होता का ? असं संजय राऊत साहेबांचं म्हणणं आहे का ? हा प्रश्न निर्माण होतो.

Tags

follow us